घरताज्या घडामोडीदेशात आता Tocilizumab इंजेक्शनचा तुटवडा, मुंबई, महाराष्ट्रातून इंजेक्शनला मोठी मागणी

देशात आता Tocilizumab इंजेक्शनचा तुटवडा, मुंबई, महाराष्ट्रातून इंजेक्शनला मोठी मागणी

Subscribe

रेमडेसिवीरसाठी देशातून अनेक राज्यांची मोठी मागणी असतानाच महाराष्ट्रासह अनेक राज्यांची चिंता गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. कोरोनाच्या अतिगंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा संपुर्ण देशभरातच निर्माण झाला आहे. त्यामुळेच कोरोना रूग्णांच्या उपचारामध्ये भर घालणारी आणि चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कोरोना रूग्णांसाठी ICU उपचारासांठी गरजेची असलेले Tocilizumab इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. सध्या चार राज्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. भारतात एकमेव अशी सीप्ला कंपनीनेही स्पष्ट केले आहे की, Tocilizumab चा स्टॉक कधी उपलब्ध होईल, याबाबत सध्या काहीच सांगता येत नाही. त्यामुळे या इंजेक्शनच्या साठ्यावर आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Tocilizumab हे धनाड्य व्यक्तींसाठीचे औषध म्हणून ओळखले जाते. कारण या इंजेक्शनची किंमतच ४० हजार ते ५० हजार रूपयांच्या घरात आहे. स्वित्झर्लंड स्थित रोच या फार्मा कंपनीकडून या इंजेक्शनची निर्मिती होते, तर भारतात सीप्लामार्फत या इंजेक्शनचे मार्केटिंग होते. कोरोना रूग्णांमध्ये असलेल्या फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी हे इंजेक्शन महत्वाचे ठरते. पण कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरूवातीच्या काही तासांमध्ये हे इंजेक्शन दिले जाणे गरजेचे आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे श्वसनात येणारा अडथळा कमी होण्यासाठी या इंजेक्शनची उपयुक्तता आहे. आमच्याकडे सध्या स्टॉक नाही, मला नवीन कोटा कधी येईल याबाबतची माहिती नाही, असे स्पष्टीकरण सीप्लाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकाही Out of Stock

अनेक राज्यात म्हणजे चंदीगढ, महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीगढ आणि केरळमध्ये सध्या कोरोनाविरोधी Tocilizumab चा तुटवडा जाणवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून चंदीगढचे डॉक्टर या तुटवड्याबाबतची तक्रार करत आहेत. तसेच महाराष्ट्रातूनही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून याबाबतची विचारपूस होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथून इंजेक्शन उपलब्ध नसल्याची घंटा याआधीच वाजली असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले. तर मुंबई महापालिकेनेही Tocilizumab ची अत्यंत कमी अशी उपलब्धतता आहे असे स्पष्ट केले आहे. हे इंजेक्शन मिळवणे कठीण झाल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. केरळच्या डॉक्टरकडूनही हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत.

भारताच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने Tocilizumab हे इंजेक्शन कोरोना संक्रमणाविरोधी उपचारासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. जे रूग्ण वेंटीलेटरवर आहेत आणि ज्या रूग्णांना एन्टी आय एल – ६ थेरपी सुरू आहे अशा रूग्णांना हे इंजेक्शन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. स्टेरॉईड्स देऊनही उपचारांना साथ न देणाऱ्या रूग्णांना आणि ऑक्सिजनची सातत्याने गरज असणाऱ्या रूग्णांसाठीही हे इंजेक्शन वापरण्याची मुभा आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाने अतिगंभीर अशा रूग्णांसाठीच या इंजेक्शनचा वापर करा असा अभ्यास लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसीनच्या माध्यमातूनही प्रकाशित झालेला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -