घरदेश-विदेशसलग १७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

सलग १७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Subscribe

सलग १७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ सुरुच आहे. आज १७ वा दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे जनता आणखी त्रस्त झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये १४ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये १५ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.२८ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७७.४७ रुपये प्रतीलिटर दराने मिळत आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला यामुळे आणखी फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दराच्या विरोधामध्ये सोमवारीच काँग्रेससह २१ पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न होता त्यामध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

१७ व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ

मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीने ८८ चा आकडा गाठला. तर डिझेलच्या दराने ७७ चा आकडा गाठला आहे. तर राजधानीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये १४ पैशांनी आणि डिझेलच्या दरामध्ये १४ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८०.८७ रुपये प्रतीलिटर तर डिझेल ७२.९७ रुपये प्रतीलिटर झाला आहे. इंधनाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. या दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती देखील वाढल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -