घरदेश-विदेशदहशतवादी हल्ल्यात जवानाचा मृत्यू; हे कधी थांबणार?

दहशतवादी हल्ल्यात जवानाचा मृत्यू; हे कधी थांबणार?

Subscribe

कुपवाडा येथे असलेल्या रेषेजवळ दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये नेहमीच चकमकी होत असतात. या चकमकींदरम्यान कधी भारतीय लष्कराचे जवान दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यशस्वी ठरतात, तर कधी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये जवानांना आपले प्राण गमवावे लागतात. आज कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात रक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. कुपवाडा येथे असलेल्या रेषेजवळ दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ANI वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातही दशहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आले होते. त्या चकमकीदरम्यान एकूण ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. मात्र, त्याचवेळीस एका जवानालाही आपले प्राण गमवावे लागले.

त्याआधी काश्मिरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये अशीच एक चकमक झाली होती. ज्यामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर केलेल्या गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू झाला होता. या चकमकीत अब्दुल मजीद, मंजूर अहमद आणि मोहम्मद अमीन या ३ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशाप्रकारच्या चकमकी, दहशतवाद्यांकडून सीमा भागत केले जाणेर भ्याड हल्ले आणि लष्कराच्या किंवा सुरक्षा दलाच्या जवानांनी अशा हल्ल्यांमध्ये नाहक आपले प्राण गमावणे… या गोष्टी कधी थांबणार असा सवाल देशातील काही नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच विचारत असतात.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -