घरट्रेंडिंगथेट ऑक्सफर्डमध्ये 'नारी शक्ती' शब्दाला मानाचे स्थान!

थेट ऑक्सफर्डमध्ये ‘नारी शक्ती’ शब्दाला मानाचे स्थान!

Subscribe

सरकारने महिला सशक्तीकरणासाठी सुरु केलेले उपक्रम आणि #Metoo आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ‘नारी शक्ती’ या शब्दाचा Oxford डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे.

‘नारी शक्ती’ या मूळ भारतीय शब्दाला आता जागतिक स्तरावरर बहुमान प्राप्त झाला आहे. ‘नारी शक्ती’ या शब्दाला ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०१८ या वर्षातील ‘वर्ड ऑफ द ईयर’ हा खिताब दिला आहे. त्यामुळे ‘नारी शक्ती’ शब्दाला थेट ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थान मिळाले आहे. प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आता इथून पुढे ‘नारी शक्ती’ हा शब्ददेखील असणार आहे. जयपूर येथे आयोजित साहित्य महोत्सवात याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘नारी शक्ती’ हा शब्द संस्कृतमधून घेण्यात आला असल्याचं ऑक्सफर्ड डिक्शनरीचं म्हणणं आहे. दरम्यान, ‘नारी शक्ती’ शब्दाचा समावेश ऑक्सफर्डसारख्या प्रख्यात डिक्शनरीमध्ये केला जाणं तसंच त्याला ‘वर्ड ऑफ द इयर’ हा सन्मान मिळणं, ही भारताची मान उंचावणारी बाब आहे.

‘नारी शक्ती’ या शब्दाचा वापर प्रकर्षाने हिंदी भाषेत केला जातो. महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या बळकटीकरणाचे तसंच सक्षमीकरणाचे हा शब्द प्रतिनिधित्व करतो. हा शब्द महिलांच्या ताकदीची, त्यांच्यातील एकीची आणि त्यांच्या प्रगतीची ओळख करुन देतो. त्यामुळे यावर बराच विचार विनीमय केल्यानंतर अखेर ‘नारी शक्ती’ या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. भारत सरकारने महिला सशक्तीकरणासाठी सुरु केलेले उपक्रम तसेच देशात एका वादळासारखे पसरलेले #Metoo आंदोलन या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, ‘नारी शक्ती’ या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्डकडूनच ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी अर्थात २०१७ मध्ये ‘आधार’ या शब्दाला ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये अशाचप्रकारे ‘वर्ड ऑफ द इयर’चे स्थान मिळाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -