घरदेश-विदेशPakistan landslide news; दोन अफगाण नागरिक ठार, तर 20 हून अधिक ट्रक गाडले गेले

Pakistan landslide news; दोन अफगाण नागरिक ठार, तर 20 हून अधिक ट्रक गाडले गेले

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या वायव्य भागात अफगाण सीमेजवळी खैबर पख्तुनख्वा प्रांतात (Khyber Pakhtunkhwa province) भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनात दोन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत, तर २० ट्रक जमिनीखाली गाडले गेल्याची माहिती आहे. जोरदार वादळानंतर या भागात भूस्खलन झाले असून बचाव अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. (Landslides have occurred in the Khyber Pakhtunkhwa province near the Afghan border in the northwestern part of Pakistan)

आज (18 एप्रिल) पहाटे जोरदार वादळामुळे भूस्खलन झाले असून माल वाहून नेणारे ट्रक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अफगाणिस्तान जवळील सीमा भागात पहाटे 3 वा. 50 मिनिटांनी ही घटना घडली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलनाचा ढिगारा सर्वत्र पसरला आहे, त्यामुळे अवजड यंत्रसामग्रीने आमचे बचावकार्य सुरू आहे. भूस्खलन स्थळ पाकिस्तानला आणि अफगाणिस्तानशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा भाग आहे. हे ठिकाण दक्षिण आशियाई देश आणि मध्य आशिया यांच्यातील व्यापाराचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. भूस्खलनादरम्यान, चालक चुलीवर सेहरीसाठी अन्न शिजवत होते, त्यामुळे तेथे आग लागली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IRCTC Railway Ticket : ऑनलाइन तिकीट बुक करताना ‘ही’ चूक केल्यास तुमचे बँक खाते होईल रिकामे

भूस्खलनामुळे गिलगिट-बाल्टिस्तान आणि इस्लामाबादमधील रस्ता तुटल्यामुळे या भागाशी संपर्क होऊ शकत नाही आहे. भूस्खलनामुळे काराकोरम महामार्ग अनेक ठिकाणी ठप्प झाला होता. काराकोरम महामार्गावर तसेच अप्पर कोहिस्तान आणि दियामेरमध्ये भूस्खलनाने अनेक रस्त्यांना तडे गेल्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.

- Advertisement -

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी ही नैसर्गिक आपत्ती एक नवीन समस्या बनली आहे. अलीकडेच पाकिस्तानातील सिंधमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. गेल्या वर्षी आलेल्या पुराच्या तडाख्यातून पाकिस्तान अद्याप सावरलेला नाही. सिंधमधील सुमारे 20,000 सार्वजनिक शाळा पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे लाखो मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. सिंधमधील पुराच्या प्रभावामुळे सरकारने शैक्षणिक आणीबाणी जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -