घरदेश-विदेशपाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले; उच्चायुक्तांनाही परत बोलावणार

पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले; उच्चायुक्तांनाही परत बोलावणार

Subscribe

पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय पाकिस्तान आपल्या उच्चायुक्तांना भारतात पाठवणार नसल्याचे समजते. पाकिस्तानने भारतासाठी नियुक्त केलेले उच्चायुक्त या महिन्यात पदभार संभाळणार होते. त्याचवेळी भारताचे उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतासोबत मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड केले जातील. याशिवाय, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्यात येतील. तसेच, बैठकीत भारतासोबत द्विपक्षीय संबंध व व्यवस्थांचा (समझौता) आढावा घेतला जाईल आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला जाईल. याशिवाय, ५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाकिस्तान साजरा करेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने कलम ३७० हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर सर्तक राहण्याचेही निर्देश दिले आहेत. इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे कलम ३७० रद्द झाल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सहन झालेले नाही. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. तसेच हा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या या पावलामुळे काश्मीरमधील हालत आणखी गंभीर होईल. त्यांनी यापुढे जात भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. तर, इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची भाषा केली आहे. फवाद चौधरी म्हणाले, ‘संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -