घरदेश-विदेशपाकिस्तानमधील ४०० मंदिरांचे करणार हस्तांतरण

पाकिस्तानमधील ४०० मंदिरांचे करणार हस्तांतरण

Subscribe

पाकिस्तानमधील ४०० हून अधिक मंदिरांना हिंदू समुदायांना हस्तांतरण करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. पाकिस्तानात राहत असलेल्या हिंदूची संख्या त्यावेळी जास्त होती. पाकिस्तानात बनवलेल्या मंदिरांचे हस्तांतरण हिंदू समुदायाला करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने दिला आहे. मागील अनेक वर्षे या मंदिरांची काळजी न घेतल्यामुळे ही मंदिरे वाईट अवस्थेत आहेत. अनेक मंदिरांच्या जागेवर माशीदींची स्थापना करण्यात आली होती. या मंदिरांची परिस्थिती सुधारावी यासाठी पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानमधील मंदिरे तेथील अल्पवयीन हिंदू समुदायाला देण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारने ४०० हून अधिक मंदिरे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगन्नाथाचे प्रचीन मंदिर खूले करणार

सियालकोट आणि पेशावर येथील मंदिरांपासून हस्तांतराची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सियालकोट येथे जगन्नाथाचे प्रचीन मंदिर आहे. हे मंदिर १ हजार वर्षाहून जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबरी मशिदीच्या वादानंतर हिंदूना या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. हिंदू भाविकांसाठी हे मंदिर खूले करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदू अधिकार चळवळीने एक सर्व्हेक्षण पाकिस्तानमध्ये केले होते. या सर्व्हेक्षणानुसार मंदिराची आकडेवारी समोर आली होती. अगोदर पाकिस्तानी सरकारने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता पाकिस्तान सरकारने मंदिरांच्या दर्शनाला परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -