घरदेश-विदेशपार्लेची मंदीतही चांदी; नफ्यात १५.२ टक्क्यांनी वाढ

पार्लेची मंदीतही चांदी; नफ्यात १५.२ टक्क्यांनी वाढ

Subscribe

पार्ले कंपनीच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील नफ्यात १५. २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंदीचे सावट असतानाही पार्ले कंपनीने कमावलेला हा नफा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

सध्या देशात मंदीचे सावट आहे. या मंदीत अनेक कंपन्या संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी देशातील मंदीची झळ नामांकित पार्ले कंपनीला देखील बसत असल्याची चर्चा सुरु होती. मंदीमुळे पार्ले कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, याच पार्ले कंपनी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पार्ले कंपनीच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील नफ्यात १५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंदीचे सावट असतानाही पार्ले कंपनीने कमावलेला हा नफा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. देशाचा विकास दर हा ६.१ टक्क्यांवर घसरला असल्याची माहिती समोर आली होती. त्यात पार्ले कंपनी देखील तोट्यात असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, पार्लेच्या नफ्यात झालेली वाढ पाहून भारताच्या अर्थव्यवस्थेत आणखी प्रगती होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पार्ले कंपनीच्या नफ्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

जीएसटीमधू सूट मिळावी अशी केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी पार्ले प्रॉडक्ट्स ग्रुपच्या पार्ले बिस्किट विभागाच्या निर्मात्यांनी आर्थिक नुकसाणीची शक्यता वर्तवून जीएसटीमधून सूट देण्याची मागणी केली होती. ‘टॉफ्लर’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पार्लेचा २०१७-१८ या वर्षातील नफा अत्यंत कमी होता. मात्र, या वर्षात तो नफा वाढून ४१० कोटीपर्यंत गेला आहे. यावर्षी कंपनीचे एकूण उत्पन्न आधीच्या आर्थिक उत्पन्नापेक्षा ६.४ टक्क्यांनी वाढले आहे. हे उत्पन्न आता ९ हजार ३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, पार्ले कंपनीच्या उत्पन्न वाढीचे वृत्त समोर येताच भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही दिवसांपूर्वी मंदीच्या मथळ्याखाली आघाडीचे अर्थशास्त्रज्ञ सांगत होते की, मंदीमुळे लोकांकडे पाच रुपयाचा पार्लेजीचा बिस्किटचा पुडा घ्यायला पैसे नाहीत. आता याच पार्ले कंपनीचा नफा १५.२ टक्क्यांनी वाढला आहे’, असे मालवीय म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली; उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका

हेही वाचा – मनोज तिवारींचा मनसेला टोला; म्हणे, ‘धडा शिकवणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -