घरमहाराष्ट्ररविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात

रविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात

Subscribe

काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडलेले राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर पुन्हा घरवापसी करणार आहेत. आज, सायंकाळी ते स्वाभिमान पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांमध्येच ते पुन्हा आपल्या मुळ घरी परतणार असल्याने राजू शेट्टींना दिलासा मिळाला आहे. तुपकर हे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष होते. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ते पुन्हा स्वाभिमानीत प्रवेश करतील, अशी माहितीही समोर येत आहे. अंतर्गत राजकारणामुळे तुपकर यांनी राजू शेट्टींची साथ सोडली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गेल्या महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी संघटनेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला होता. तसे रविकांत तुपकर यांनी स्वाक्षरीनिशी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना पत्र पाठवले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर रविकांत तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -