घरदेश-विदेशविमातच सुरु केला 'योगा'; न ऐकल्याने विमानभाडे देऊन उतरवले

विमातच सुरु केला ‘योगा’; न ऐकल्याने विमानभाडे देऊन उतरवले

Subscribe

एका विमान प्रवाशांनी विमानातच योगा सुरु केल्याने त्याला विमामभाडे परत करत जबरदस्तीने उतरवले.

आपले शरीर सृदृढ रहावे यासाठी नियमित योगा केला जातो. मात्र, एका विमान प्रवाशांने चक्क विमानामध्ये योगा केल्याची घटना समोर आली आहे. कोलंबोसाठी उड्डाण करणाऱ्या विमानामध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. एका श्रीलंकेच्या नागरिकाने विमानातच योगा करण्यास सुरुवात केली. त्या प्रवाशाला योगा करण्यासाटी विरोध केला गेला. मात्र, या प्रवाशांनी कोणाचेही न ऐकल्याने त्या प्रवाशाला चेन्नई विमानतळावर त्याच्या तिकिटाचे पैसे देऊन जबरदस्तीने उतरविण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

कोलंबोसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात श्रीलंकेचा नागरिक गुणासेना हा वाराणसीहून प्रवास करत होता. अचानक गुणासेनाने विमानात योगा आणि कसरती करण्यास सुरुवात केली. त्याच्या या वागण्यामुळे इतर प्रवाशांना देखील त्रास होऊ लागला. त्यावेळी त्याला योगा करण्यासाठी विरोध करण्यात आला. मात्र, त्याने कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. तो कोणाचेही ऐकत नसल्याने अखेर त्याला सीआयएसएफच्या जवानांच्या मदतीने विमानातून जबरदस्तीने उतरवण्यात आले. विशेष म्हणजे त्याचे तिकिटाचे पैसेही त्याला देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुणासेनाविरोधात तक्रार दाखल केलेली नसून त्याला श्रीलंकेच्या उच्चायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. तसेच या प्रवाशाकडे श्रीलंका आणि अमेरिका अशा दोन देशांचा पासपोर्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तोंडाला मास्क लावून दिल्लीतील मुलं शाळेत हजर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -