घरदेश-विदेशनिर्भया प्रकरण: पवन कुमार गुप्ताची सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिका

निर्भया प्रकरण: पवन कुमार गुप्ताची सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिका

Subscribe

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमार गुप्ता याने सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका दाखल केली आहे. ३ मार्चला होणार्‍या फाशीपूर्वी पवन गुप्ताने आपल्याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेत बदल करून ती आजन्म कारावास अशी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. पवन गुप्ता याचे वकील ए. पी. सिंह याने कोर्टात ही माहिती दिली.

ट्रायल कोर्टाने निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासाठी ३ मार्चचे डेथ वॉरन्ट जारी केले आहे. येत्या सोमवारी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टात होणार्‍या सुनावणीदरम्यान फेटाळण्याची शक्यता आहे. असे झाले नाही, तर पवनचे वकील या डेथ वॉरन्टला स्थगिती द्यावी अशी मागणी करणार हे नक्की.तथापि, पवनच्या क्यूरेटीव्ह याचिकेनंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार अद्याप शिल्लक आहे. सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींना केलेल्या दया याचिकेवर निर्णय येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. हे लक्षात घेता ३ मार्चला डेथ वॉरन्टची अंमलबजावणी होणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच तीन मार्च नंतर नव्या तारखेचे डेथ वॉरन्ट निघेल असे म्हटले जात आहे.

- Advertisement -

या प्रकरणात उर्वरित तीन दोषी अक्षय, विनय आणि मुकेश यांची सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका आणि राष्ट्रपतींकडे दाखल केलेली दया याचिका या पूर्वीच फेटाळल्या गेल्या आहेत. दया याचिका फेटाळल्याच्या विरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात रिट दाखल केले होते. मात्र, ते फेटाळण्यात आले आहे. पवनने मात्र आतापर्यंत क्यूरेटीव्ह याचिका दाखल केलेली नव्हती. आता मात्र त्याने फाशीची शिक्षा आजन्म कारावासात बदलण्याची विनंती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -