घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटउंच इमारतीत राहणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक; नवीन संशोधन

उंच इमारतीत राहणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक; नवीन संशोधन

Subscribe

मुंबईतील धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे कोरोना हा झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या परिसरातच होतो, असा एक समज झाला होता. मात्र आता एक नवे संशोधन समोर आले आहे. उंच इमारतीमध्ये राहणाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण इमारतींना पाण्याचा पुरवठा एकाच ठिकाणाहून होत असतो. तर सिव्हरेज लाईनसुद्धा एकच असल्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, असा दावा संधोधनाच्या माध्यमातून केला आहे.

स्कॉटलँडच्या हेरियट वॅट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी (Heriot-Watt University) हे संशोधन केले आहे. या विद्यापीठातील पाणी अकादमीचे संचालक मायकल गॉर्म्ले यांनी सांगितले की, मोठ्या आणि उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. कारण पाण्याचा पुरवठा एकाज जागेवरुन होतो. तीच अवस्था रुग्णालयांची देखील आहे.

- Advertisement -

यासोबतच युनिव्हर्सल सायन्स या सकेंतस्थळावरील बातमीनुसार मानवा कडून दुसऱ्या मानवाकडे होणारे संक्रमण हे सामान्य आहे. मात्र पाणी पुरवठ्यातून होणारे संक्रमण ही एक असामान्य मात्र शक्य असणारी गोष्ट आहे.

- Advertisement -

मायकल यांच्या मतानुसार जर इमारतीच्या प्लबिंग सिस्टिममध्ये जरे व्हायरसचा शिरकाव झाला तर इमारतीमधील सर्वांनाचा हे महाग पडू शकते. २००३ साली हाँककाँगच्या एमॉय गार्डन्स नावाच्या इमारतीमध्ये सार्स व्हायरसचा अशाच पद्धतीने फैलाव झाला होता. एमॉय गार्डन्स येथे ३३ ते ४१ मजली इमारती होत्या. ज्यामध्ये १९ हजार लोक राहत होते. जेव्हा सार्स व्हायरसचा फैलाव झाला तेव्हा ३०० लोक संक्रमित झाले, तर ४२ लोकांचा मृत्यू झाला. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात येथे पाण्याच्या माध्यमातून सार्स व्हायरस पसरला, असा निष्कर्ष काढण्यात आला.

सिंक आणि टायलेटमध्ये यु आकराचा पाईप लावलेला असतो. या पाईपमध्ये जमा होणाऱ्या पाण्यात एअरबॉर्न व्हायरस आपले घर बनवतो. जेव्हा पाण्याचा प्रवाह सुरु झाला, तेव्हा अनेक लोक आजारी पडायला लागले. मायकलच्या मतानुसार त्यांनी येथील इमारतींचा अनेक वर्ष अभ्यास केला. त्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले होते. त्यामुळे सार्स सारखा कोरोना व्हायरस देखील पसरू शकता, असा अंदाज मायकल यांनी वर्तविला आहे.

यानंतर मायकल यांनी काही सुरक्षेचे उपाय देखील सुचवले आहेत. जर तुमच्या इमारतीमधील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली असेल तर ती त्वरीत दुरुस्त करुन घ्या. पाईपलाईन वारंवार डिसइन्फेक्टेड करुन घ्यायला हवी. तसेच इमारतीमधील रहिवाशांनी वैयक्तिक स्वच्छता आणि आपल्या घरातील पाईपलाईनवर देखील लक्ष ठेवले पाहीजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -