घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन रुग्णालयात, प्रकृती स्थिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन रुग्णालयात, प्रकृती स्थिर

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी ( १००) (Heeraben Modi) यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता (UN Mehta Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी ( १००) (Heeraben Modi) यांची तब्येत खालावली असून त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता (UN Mehta Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

हीराबेन यांनी याचवर्षी जूनमध्ये वयाची शंभरी पूर्ण केली. तेव्हापासूनच त्यांच्या तब्येतीत चढ उतार सुरू आहे. सध्या मेहता रुग्णालयातील डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयाने हीराबेन मोदी यांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी मेडीकल बुलेटन जारी केले आहे. त्यात माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना अहमदाबाद येथील युएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डीयोलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही मेडिकल बुलेटीनमध्ये सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई हीराबेनबदद्ल विशेष स्नेह आहे. हीराबेन गांधीनगरमध्ये मोदींच्या भावाबरोबर राहतात.
मोदी वरचेवर आईला भेटण्यासाठी गुजरातला जात असतात. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर बऱ्याचवेळा व्हायरल होतात. गुजरात विधानसभा निवडणूकीवेळी पंतप्रधान मोदी गुजरातला आले होते. त्यावेळीही त्यांनी आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले होते.

मोदींच्या भावाच्या कारला अपघात

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधू प्रल्हाद मोदी यांच्या गाडीला मंगळवारी कर्नाटकमधील म्हैसूर येथे अपघात झाला. प्रल्हाद मोदी मुलगा व सूनेबरोबर मर्सिडिज बेंझ या कारमधून बंगळुरूहून बांदीपुर येथे जात असताना हा अपघात झाला. यात तिघेही किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -