घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात थर्टीफस्टसाठी ७.४० लाख मद्यपींनी काढला मद्य पिण्याचा परवाना

नाशकात थर्टीफस्टसाठी ७.४० लाख मद्यपींनी काढला मद्य पिण्याचा परवाना

Subscribe

नाशिक : चहा, पानाचे दर वाढत असले तरी दारु पिण्याचा परवाना फक्त पाच रुपयात मद्यपींना शहरातील मद्य विक्रीच्या दुकानात दिला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज), नाशिकने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपींसाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. एक्साईकडे आत्तापर्यंत तब्बल ७ लाख ४० हजार मद्यपींना एक दिवसीय मद्य पिण्याचा परवाना काढला आहे. त्यामुळे मद्यपींना दारू घेताना किंवा पिताना पोलिसांकडून पकडले जाण्याचा अजिबात धोका राहिलेला नाही.

कोरोनामुळे निर्बंध असल्याने दोन वर्ष घरबसल्या तळीरामांना थर्टी फस्टचे सेलिब्रेशन करावे लागले होते. मात्र, २०२२ मध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात मद्यपींनी मद्य परवाना मिळवण्यास सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या माहितीनुसार आतापर्यंत साडे सात लाख मद्यपींनी मद्य प्राशन करण्यासाठी परवाना देण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांसाठी वैयक्तिक ते पाटर्यांमध्ये केल्या जाणार्‍या मद्यपानापर्यंतचे परवाने दिले जातात. यामध्ये एकदिवसीय, वार्षिक व आजीवन अशा स्वरुपाचेही परवाने दिले जात आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपींकडून जल्लोष करीत पार्ट्यां केल्या जातात. मात्र मद्यपींकडे परवाना नसेल तर कारवाई केली जाते. राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांकडून होणारी ही कारवाई टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य पिण्याचेे परवाने दिले जात आहेत. मद्याच्या दुकानांमध्येही मद्यपींना देशी व विदेशी मद्य पिण्याचा परवाना दिला जात आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 7 लाख तळीरामांनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत. यामध्ये देशी मद्यासाठीचे 5 लाख 20 हजार तर, विदेशी मद्यासाठीचे 2 लाख 20 हजार असे एकूण 7 लाख 40 हजार मद्यपींनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -