घरदेश-विदेशViral Video - लष्करी अधिकाऱ्याशी हात मिळवला आणि मोदी खाली वाकले!

Viral Video – लष्करी अधिकाऱ्याशी हात मिळवला आणि मोदी खाली वाकले!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये दाखल होताच त्यांच्या एका कृतीचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ते ह्युस्टनमध्ये दाखल झाले. ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. मात्र, मोदी जेव्हा सकाळी ह्युस्टनमध्ये दाखल झाले, तेव्हा घडलेल्या एका अजब प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ह्युस्टनमध्ये विमानातून उतरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आले होते. मात, त्यात एका लष्करी अधिकाऱ्याशी हस्तांदोलन करताच पंतप्रधान मोदी खाली वाकले. त्यांच्या या कृतीसाठी त्यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नक्की झालं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानातून खाली उतरताच त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांशी त्यांनी हस्तांदोलन करायला सुरुवात केली. यावेळी एका महिला पदाधिकाऱ्याने त्यांना फुलांचा बुके भेट म्हणून दिला. तो बुके मोदींनी जवळच्या सुरक्षारक्षकाच्या हाती देताना त्यातलं एक फूल खाली पडलं. तोपर्यंत मोदींनी पुढे उभ्या असलेल्या लष्करी अधिकाऱ्याशी हस्तांदोलन केलं होतं. मात्र, नेमकं तेव्हाच या महिला अधिकाऱ्याला फूल खाली पडल्याचं लक्षात आलं. फुलाकडे हात करता करता शिष्टाचार म्हणून या महिला अधिकाऱ्याने काहीही सांगितलं नाही. मात्र, महिलेचा हात फुलाकडे गेलेला मोदींनी पाहिला आणि त्यांनी स्वत: समोरच्या लष्करी अधिकाऱ्याचा हात हातात घेऊनच खाली वाकत ते फूल उचलून सुरक्षा रक्षकाकडे दिलं. शिष्टाचाराचा आडपडदा न ठेवता खाली वाकून फूल उचलणाऱ्या मोदींचं आता कौतुक होऊ लागलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

ट्रम्प देखील राहणार उपस्थित

टेक्सास इंडिया फोरमच्या वतीने ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्युस्टनच्या एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असल्याचं बोललं जात आहे. ५० हजारांहून अधिक अमेरिकी भारतीय या कार्यक्रमाला येणार असल्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -