घरदेश-विदेशराहुल गांधींच्या आरोपांवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले!

राहुल गांधींच्या आरोपांवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या वर्षभरातल्या त्यांच्या पहिल्याच मुलाखतीमध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

सरत्या वर्षात नक्की काय काय झालं? भारताच्या पारड्यात काय पडलं, काय नाही? आणि भाजपला २०१९मध्ये किती फटका बसणार? अशा सगळ्याच विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्तरं दिली. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशा प्रकारे एखाद्या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना नरेंद्र मोदींना राहुल गांधी आणि काँग्रेसला टोला लगावला. ‘जे लोकं म्हणत आहेत की मोदी लाट आता उरली नाही, त्यांनी किमान हे तरी मान्य केलंच आहे की मोदी लाट होती म्हणून’, अशी खोचक टीका मोदींनी यावेळी मुलाखतीमध्ये केली आहे.

राम मंदिरावर तूर्तास अध्यादेश नाही

राम मंदिराबद्दल अध्यादेश लगेच काढणार नाही. न्यायालयीन प्रक्रियेनंतर अध्यादेशाबाबत निर्णय घेतला जाईल. पण अध्यादेशाच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस अडथळे आणत आहे. काँग्रेसचे वकील यामध्ये अडथळे आणत आहेत. जे घटनात्मक असेल, तोच निर्णय आम्ही घेऊ.

- Advertisement -

नोटाबंदी हा धक्का नव्हता

लोकांना वर्षभरापूर्वी सावध केलं होतं. त्यामुळे हा अचानक केलेला स्ट्राईक नव्हता. काळा पैसा भरायला सांगितला होता. अनेकांना वाटलं मोदी इतरांसारखेच वागतील. पण त्यामुळे त्यावेळी खूप कमी लोकं काळा पैसा भरण्यासाठी पुढे आले.

एका स्ट्राईकमध्ये पाकिस्तान सुधारणार नाही

एका स्ट्राईकमध्ये पाकिस्तान सुधरणार नाही. पाकिस्तानला सुधरायला वेळ लागेल. त्यामुळे लगेच सीमेवरची परिस्थिती सुधारणार नाही.

- Advertisement -

सर्जिकल स्ट्राईकचा भाजप राजकीय फायदा घेतंय का?

त्याचा राजकीय फायदा कुणीही घेऊ नये. जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला, तेव्हा सैन्याच्या प्रमुखाने देशाला सांगितलं. पाकिस्तानला देखील याविषयी माहिती देण्यात आली. पण देशातल्या काही पक्षांनी सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. पाकिस्तानचं हे कामच आहे. पण देशातल्या इतर राजकीय पक्षांनी राजकीयिकरण सुरू केलं. ज्यांनी अशा प्रकारे सैन्यावर संशय घेतला, ते चुकीचं केलं.

‘राफेल मुद्द्यावर राहुल गांधींनी आरोप सिद्ध करून दाखवावेत’

हा माझ्यावर आरोप नाही, सरकारवर आहे. माझ्यावर आरोप करण्यासाठी त्यांना सगळा लेखाजोखा मांडावा लागेल. त्याशिवाय मी संसदेमध्ये यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्णय दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावे. मी एकदा संसदेमध्ये स्पष्टीकरण दिलं, आता मी पुन्हा पुन्हा त्यांना सांगत राहू का?

भाजप देशातल्या संस्था मोडून काढतंय का?

काँग्रेसला हे सगळं बोलण्याचा हक्कच नाही. काँग्रेसने देखील वरिष्ठ न्यायाधीशांना काढून कनिष्ठ न्यायाधीशांना नियुक्त केलं होतं. प्लॅनिंग कमिशनच्या सदस्यांना जोकर म्हटलं होतं. जेव्हा सीबीआयचा मुद्दा आला, तेव्हा संस्था महत्त्वाची मानून त्यांना सुट्टीवर काढायला सांगितलं. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेलांनी मला वैयक्तिकरित्या मला पदावरून हटवण्याची विनंती केली होती. ६-७ महिन्यांपासून ते मला तेच सांगत होते. ईडी व्यावसायिकपणे आपलं काम करत आहे. मिशेलला वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा सभासद वकील म्हणून जातो, तेव्हा तो चिंतेचा विषय असतो. तुम्ही त्याची मदत करता.

‘म्हणे मोदी लाट राहिली नाही’

जेव्हा कुणी असं म्हणतं की मोदी लाट नाही, तेव्हा ते हे स्वीकार करतात की मोदी लाट होती. २०१३-१४चे वर्तमानपत्र काढा आणि वाचा. विशिष्ट लोकंच टीका करत आहेत की मोदी काही करू शकत नाहीत. त्यामुळे आतासुद्धा  त्यांना काहीतरी द्यावंच लागेल. त्यामुळे किमान त्यांनी मोदी लाट असल्याचं मान्य केलं आहे. मला वाटतं की लाट ही जनतेच्या आशा-आकांक्षांची असते. आणि आज देशात तरुणांमध्ये उत्साहाची लाट आहे.

पाच राज्यांच्या निवडणुका

तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजप सत्तेवर येईल असं कुणालाही वाटत नव्हतं. छत्तीसगडमध्ये भाजपचा सरळ पराभव झाला. पण इतर दोन राज्यांमध्ये म्हणजेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्रिशंकू विधानसभा झाली. अनेक जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. त्रिपुरा, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपशी जोडले गेलेले उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे जिंकणं आणि हरणं हाच एक मापदंड असत नाही.

भाजपला १८०पेक्षा कमी जागा मिळतील?

विरोधक जर अशा गोष्टी बोलले नाहीत, तर त्यांना त्यांच्या आघाडीमध्ये इतर पक्षांना आणण्यासाठी काहीतरी लागेल ना? अशी आकडेवारी सांगण्यासाठी काहीतरी वैज्ञानिक आधार लागेल. २०१४मध्ये सुद्धा २०० पेक्षा कमी जागा येतील असंच बोललं गेलं होतं. पण आज राजकीय पंडितांनी देशातल्या सामान्य मतदारांवर विश्वास ठेवायला हवा. असं काय घडलं आहे की लोकांना वाटेल की या सरकारचा पराभव करायला हवा?

सामान्य नागरिक काँग्रेसला पर्याय मानू लागले आहेत?

काँग्रेसची माणसं म्हणतात की काँग्रेस हा एक विचार आहे. इतक्या वर्षांपर्यंत काँग्रेस संस्कृती भारतीयांमध्ये राहिली. आणि ती संस्कृती काय आहे? जातीयवाद, प्रांतवाद आहे. मला या संस्कृतीपासून भारताला मुक्त करायचं आहे.

परदेश दौरे इतके जास्त का?

सगळेच पंतप्रधान साधारणपणे इतकेच दौरे करतात. आंतरराष्ट्रीय फोरम मोठा झाला आहे. त्यामुळे तिथे जावंच लागतं. पूर्वी फक्त संयुक्त राष्ट्रामध्ये जावं लागायचं. आता जीएट सारख्या गोष्टी देखील आहेत. मी जेव्हा जातो, तेव्हा आसपासच्या एक-दोन देशांमध्ये सुद्धा जाऊन येतो. कमी खर्चात होतं. आधी जेव्हा पंतप्रधान जायचे, ते कळत नव्हतं. पण मी जातो तेव्हा काहीतरी निर्णय करतो. त्यामुळे ते सगळ्यांना कळतं. आणि अशा परदेश दौऱ्यांमध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.

मी आलो तेव्हा १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती

मी आलो तेव्हा १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. २०१८मध्ये सगळ्या गावांमध्ये वीज आली. स्पोर्ट्समध्ये देखील भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१८मध्ये पीक उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळे २०१८ हे वर्ष भारतासाठी यशस्वी वर्ष ठरलं आहे.

दक्षिण भारतात भाजप का नाही?

आम्ही गोवा, गुजरात, कर्नाटकमध्ये सरकारमध्ये आहोत. त्यामुळे दक्षिणमध्ये आम्ही आहोत. आमच्या पक्षामध्ये सगळ्यात जास्त दलित, शेतकरी, ग्रामीण भागातले खासदार आहेत. त्यामुळे हा जुना विचार आहे. भाजपचा तमिळनाडू आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा खासदार आहे. आम्ही नेहमीच सगळ्यांसोबत जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्थानिक पक्षांसोबत युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

मी ठरवलंय..जितक्या शिव्या पडल्या तरी चालतील. पण मी इमानदारीने काम करत राहणार. देशाच्या सैनिकांची जी गरज आहे, ते सगळं मी खरेदी करत राहीन. यांच्या आरोपांसाठी मी माझ्या देशाच्या सैन्याला कमकुवत करू शकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -