घरमुंबईकायद्याचे विद्यार्थीच न्यायाच्या प्रतीक्षेत

कायद्याचे विद्यार्थीच न्यायाच्या प्रतीक्षेत

Subscribe

चार महिन्यांपासून मार्कशिटसाठी वणवण , मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार

पदवी प्रमाणपत्राच्या यादीमध्ये अनेक विद्यार्थ्यांची नावेच नसल्याचा प्रकार नुकताच मुंबई विद्यापीठात उघडकीस आला. त्यापाठोपाठ आता मार्र्कशिटसाठी कायदे पदवीचे अभ्यासक असलेल्या विद्यार्थ्यांना वणवण फिरावे लागत असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट येथील गर्व्हरमेंट लॉ कॉलेजमधून परीक्षा देणार्‍या एका विद्यार्थिनीला तब्बल चार महिने झाले तरी मार्कशिट मिळाली नाही. विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थिनीला सनद घेणे तसेच अन्य परीक्षा देण्यामध्ये अडचणी येत असल्याने तिला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नागपूरची रहिवासी असलेली मृण्मयी अनिल नीता कोटपमल्लीवार हिने चर्चगेट येथील गर्व्हरमेंट लॉ कॉलेजमधून दहाव्या सेमिस्टरची परीक्षा दिली. परंतु त्यामध्ये तिला केटी लागल्याने तिला मार्कशिट देण्यात आली नाही. त्यानंतर तिने केटी लागलेल्या विषयाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली. पुनर्मूल्यांकनामध्ये मृण्मयी उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला मार्कशिट मिळणे अपेक्षित होते. परंतु तिची मार्कशिट राखीव ठेवण्यात आल्याने तिला मार्कशिट देण्यात आली नाही. यासंदर्भात तिने विद्यापीठाकडे चौकशी केली असता तिला मार्कशिटसाठी अर्ज करण्यास सांगितले. परंतु अर्ज केल्यानंतर तिला एक महिन्यांनी घरी स्लिप येईल, असे सांगण्यात आले. परंतु स्लिप न आल्याने तिने पुन्हा विद्यापीठाकडे चौकशी केली असता तिला एक महिन्याने पुन्हा बोलावण्यात आले.

- Advertisement -

पुनर्मूल्यांकनाचा रिझल्ट येऊन चार महिने उलटले तरी तिला मार्कशिट मिळालेली नाही. त्यामुळे एकीकडे पुर्नमुल्यांकनामध्ये उतीर्ण झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येते. परंतु राखीव असलेली मार्कशिट मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतरही मार्कशिट मिळालेली नाही. त्यामुळे मृण्मयीची मार्कशिटसाठी वणवण सुरू आहे. तिला वेळीच मार्कशिट न मिळाल्याने बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा (बीसीएमजी)कडून मिळणारी सनद घेता येत नाही. त्यामुळे तिला प्रॅक्टिसही करता येऊ शकणार नाही. नागपूरला राहत असल्याने तिला वारंवार मुंबईमध्ये येणे अशक्य असल्याने तिला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मृण्मयीप्रमाणे पुनर्मुल्यांकनामध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मार्कशिट मिळाली नाही. विद्यापीठ प्रशासन व कॉलेज यांच्यामध्ये नसलेला समन्वय व विद्यापीठाअंतर्गत चुकीच्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे यासंदर्भात कुलगुरूंनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

राखीव ठेवण्यात आलेल्या मार्कशिटबाबत विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो. परंतु विद्यापीठातील अंतर्गत चुकीच्या कामाचा फटका नेहमी विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे यापुढे विद्यापीठानेच अशा मार्कशिटबाबत प्रक्रिया करावी व विद्यार्थ्यांना अर्ज मिळवून द्यावेत.
– अ‍ॅड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -