घरदेश-विदेशAssam Elections: 'सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते'; मोदींचा हल्लाबोल

Assam Elections: ‘सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते’; मोदींचा हल्लाबोल

Subscribe

कॉंग्रेस पक्ष केवळ घुसखोरीची हमी देतो, मोदींचा काँग्रेसवर निशाणा

आसाममध्ये येत्या २७ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहपुरिया येथील लखीमपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूका आल्याने सर्वच पक्ष आपल्या पक्षांचा प्रचार करण्यासाठी जय्यंत तयारीला लागले आहे. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, ‘कॉंग्रेस असा एकच पक्ष आहे, जो गरज पडल्यास धोका (फसवणूक) देऊ शकतो. आसाममध्ये या पक्षाने सर्वसामान्यांसाठी कोणतेही काम न करता केवळ आपल्या राजवटीखाली केवळ खुर्ची वाचविण्यासह सत्तेत राहण्याचे काम केले. तर कॉंग्रेस पक्ष केवळ घुसखोरीची हमी देतो. कॉंग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी काहीही करू शकतो कोणत्याही थराला जावू शकतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.

आसाममधील गरीबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५.५ लाखाहून अधिक घरे मंजूर केली गेली आहेत. यातील बर्‍याच लाभार्थ्यांना पक्की घरे मिळाली आहेत. ज्यांना अद्याप पक्के घर मिळाले नाही, त्यांना पक्के घरदेखील मिळणार असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी प्रचारसभेला संबोधित करताना दिलं. तर कांजीरंगा आज कॉंग्रेसच्या ताब्यातून मुक्त झाला आहे. आसाममध्ये आता अवैध धंदे आणि अराजकतेपासून मुक्तता मिळाली असून विकासाच्या दृष्टीने अनेक कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यासह प्रचारसभेला संबोधित करताना मोदी पुढे म्हणाले की, ज्यांना आसामची ओळख आणि त्यांची संस्कृती नष्ट करायची आहे त्यांच्याशी काँग्रेसने हात मिळवणी केली आहेत. मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलो आहे, मतदानासाठी कॉंग्रेस काहीही करू शकते. कोणत्याही थराला जावू शकते. कोणाचाही आधार घेऊ शकते. आसाममधील लोक तुम्ही तुमची संस्कृती नष्ट होऊ देऊ नका. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, जगातील आसामचा चहा नष्ट करण्याचे कामही कॉंग्रेस पक्षाने केले आहे, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर लक्ष्य केले. भाजपाने आसामसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, यामध्ये आसामची संस्कृती जोपासण्यासाठी आणि यासह राज्याला आत्मनिर्भर करण्याचे आश्वासन देखील मोदींनी जनतेला दिले आहे.


Assembly Election 2021: बिहार विधानसभेत फुल्ल ऑन राडा! आमदारांना फिल्मी स्टाईने मारहाण
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -