घरताज्या घडामोडीCorona Vaccination: देशातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरण मंदावले, मोदींचा देशवासीयांना नवा मंत्र

Corona Vaccination: देशातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरण मंदावले, मोदींचा देशवासीयांना नवा मंत्र

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावरून परतल्यानंतर आज देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण मंदावले आहे, त्या जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी नवा मंत्र घरोघरी लसीकरण देत म्हणाले की, ‘अजूनही आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई सुरू ठेवणे गरजेचे आहे. देशातील १३ राज्यांमध्ये ४८ जिल्हे असे आहेत, जिथे कोरोना लसीकरणातील पहिला डोस ५० टक्के पण झाले नाही आहे. त्यामुळे गावागावात लसीकरण करण्याचे नियोजन करा. घरोघरी लसीकरण मोहीम राबवा,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले.

पुढे मोदी म्हणाले की, ‘परदेशी दौऱ्या दरम्यान पोप यांच्याशी लसीकरणाबाबत चर्चा केली. लसीकरणासाठी स्थानिक धर्मगुरुंची मदत घ्या. तसेच एनसीसी, एनएसएसची मदत घ्या. प्रत्येक घराचं लसीकरण हेच उद्दिष्ट आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. कोरोनाविरोधातील लढाई आपण जिंकणारचं.’

- Advertisement -

‘सबको वॅक्सिन, मुफ्त वॅक्सिन अभियानअंतर्गत आपण एका दिवसात अडीच कोटी डोस दिल्याचे आपण दाखवले आहे. आपली क्षमता आणि आपण सामर्थ्य काय आहे हे दाखवून दिले आहे. पण सध्या अजूनही एक आवाहन आहे, ते म्हणजे लसीकरण संदर्भातील अफवा आणि लोकांमधील भ्रम. आताही बैठकीदरम्यान याचा उल्लेख केला गेला. यावर एक मोठा उपाय म्हणजे लोकांना अधिकाधिक जागरूक करणे. त्यामुळे यामध्ये स्थानिक धर्मगुरुंची मदत घ्या. १०० वर्षातील सर्वात मोठी महामारीमध्ये देशाने अनेक आवाहानांचा सामना केला आहे. कोरोनाच्या लढाईत देशाने नवनवीन उपाय केले. त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी नवनवीन उपायांवर जास्त काम करावे लागेल,’ असे मोदी म्हणाले.


हेही वाचा – Delta Variant : मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपी ठरतेय डेल्टा व्हेरीयंटवर प्रभावी, संशोधनातील निष्कर्ष


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -