घरदेश-विदेशदेशात कोरोनाची दुसरी लाट? पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक

देशात कोरोनाची दुसरी लाट? पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने कोरोनाची दुसरी लाट आली आहे का? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसंच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवाय, कोरोना लस वाटपासंबंधीच्या धोरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होणार आहेत.

पंतप्रधान मोदी पहिल्या बैठकीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत, अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत कोरोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. दरम्यान, दिल्ली नंतर आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे काही राज्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोना लसीचा आपत्कालीन वापरण्याची शक्यता?

कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत आणि लसीचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे. निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत अलीकडेच झालेल्या बैठकीत, या लसींच्या किमतीसह आगाऊ खरेदीबाबतच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. “PMO ने गठित केलेले लस कृती दल (व्हॅक्सिन टास्क फोर्स- व्हीटीएफ) या लसीच्या आणीबाणीकालीन वापराच्या अधिकारांचे नियम तयार करेल, तर या लसी देण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाने (नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९) या लसीच्या किंमतीसह ती वेळेपूर्वी बाजारात आणण्याबाबतचे नियम तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे या बैठकीत ठरले,” अशी माहिती एका सूत्राने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -