घरदेश-विदेशदेशात ११ वर्षांनंतर खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ, महागाईने किचनचे बजेट कोलमडले!

देशात ११ वर्षांनंतर खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ, महागाईने किचनचे बजेट कोलमडले!

Subscribe

कोरोना महामारी दरम्यान वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता प्रचंड हैराण झाली आहे. देशात खाद्यतेलांच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, खाद्यतेलांच्या किंमती गेल्या दशकात सर्वात उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सोमवारी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने खाद्य तेलांच्या वाढत्या किंमतीसंदर्भात सर्व पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत, विभागाने राज्याबरोबरच व्यवसायांना खाद्य तेलांची किंमत कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात ११ वर्षांनंतर खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाली असून या महागाईने महिलांच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.

या बैठकीनंतर विभागाने देखील एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात असे म्हटले की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमतींनी भारतातल्या किंमतींमध्ये खूपच वाढ झाली असल्याची नोंद आहे. याबाबत केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली. त्यानंतर खाद्यतेल व्यापाराच्या संबंधित या बैठकीसाठी सर्व पक्षांना बोलावण्यात आले. भारतात ६० टक्क्यांहून अधिक खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते, म्हणून ते आंतरराष्ट्रीय किमतींशी जोडले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

जानेवारी २०१० नंतर तेलाची सर्वोच्च किंमत

राज्य नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ खाद्यतेलाची महिन्याची सरासरी किंमत जानेवारी २०१० पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. ग्राहक माहिती, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय कोणत्या वेबसाइटवर हे डेटा उपलब्ध याची माहितीही घेण्यात आली. मंगळवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत १६४.४४ रुपये प्रति किलो झाली असून ती गेल्या वर्षीच्या मे महिन्यापेक्षा ते ३९ टक्के जास्त आहे. मे २०२० मध्ये मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत ११८.२५ रुपये प्रति किलो होती. हे तेल प्रामुख्याने भारतातील सर्व घरात स्वयंपाकासाठी वापरले जाते. मे २०१० मध्ये याची किंमत प्रतिकिलो किंमत ६३.०५ रुपये इतकी होती.

यासह अन्य तेलांमध्ये शेंगदाणा तेलाची सरासरी किंमत १७५.५५ रुपये, सोयाबीन तेलासाठी १४६.२७ रुपये आणि सूर्यफूल तेलाच्या १६९.५४ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या तेलांची सरासरी किंमत १९ वरून थेट ५२ टक्के वाढ करण्यात आली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -