घरदेश-विदेश'भारत माता की जय' घोषणेमुळे ममता दीदींना राग का येतो- पंतप्रधान मोदी

‘भारत माता की जय’ घोषणेमुळे ममता दीदींना राग का येतो- पंतप्रधान मोदी

Subscribe

विकासाची गती कायम ठेवण्यात बंगाल मागे का राहिला, अशी विचारणा करत ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला

पंतप्रधान मोदी आज आसाम व पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. हल्दिया येथील एका सभेत बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी बोलताना मोदींनी ‘पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत सांगत भारत माता की जय घोषणेमुळे ममता दीदींना एवढा राग का येतो असा प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. तसेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर भ्रष्टाचारे आरोप लावले आहेत. या जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहिले काँग्रेसने राज्यं केलं तर मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार समोर आला. डाव्यांच्या शासनकाळात भ्रष्टाचार व अत्याचार दिसून आला आणि विकास ठप्प झाला. त्यानंतर ममता यांनी परिवर्तनाचं वचन दिलं, लोकांनी विश्वास ठेवला. मात्र दहा वर्षांच्या शासनकाळात हे स्पष्ट झाले की हे परिवर्तन नव्हतं तर डाव्यांचे पुनर्जीवन आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधली गरीबीचे प्रमाण वाढत गेलं, उद्योगधंदे बंद होत गेले.” असाही आरोपी यावेळी मोदींनी केला.

त्याप्रमाणे “बंगालमध्ये आपली लढाई टीएमसी बरोबर आहे. मात्र आपल्याला त्यांच्या छुप्या मित्रांपासून देखील सावध रहावं लागणार आहे. डावे, काँग्रेस आणि टीएमसी हे पडद्यामागे मॅच फिक्सिंग करण्यात गुंतले आहेत. दिल्लीत भेटून ते राजकारणावर चर्चा करतात. केरळमध्ये काँग्रेस व डाव्यांनी मिळून पाच वर्ष राज्याला लुटण्याचा करार केला आहे.” अशा भाषेत मोदींनी टीएमसीसह काँग्रेस व डाव्या पक्षांवरही टीकेचा बाण सोडला. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत अनेक पटीने पुढे होते. बंगालमध्ये पायाभूत सुविधा उत्तम होत्या. नोकऱ्यांच्या अनेकविध संधी होत्या. भारतासह संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या बंगालला आजही मोठा सन्मान प्राप्त होतो. असे सर्व असताना विकासाची गती कायम ठेवण्यात बंगाल मागे का राहिला, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली.

- Advertisement -

भारतासह संपूर्ण देशाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या बंगालच्या भूमिला साष्टांग नमस्कार करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनानिमित्त बंगालमध्ये आलो होतो. आता पश्चिम बंगालच्या विकासात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे, तसेच कोलकाता येथे साडे आठ हजार कोटी अपेक्षित खर्च असणारा प्रकल्प सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -