घरताज्या घडामोडीफडणवीसांसोबत माझा शपथविधी पहाटे झालाच नव्हता! - अजित पवार

फडणवीसांसोबत माझा शपथविधी पहाटे झालाच नव्हता! – अजित पवार

Subscribe

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टीचं गूढ लागून राहिलं असेल तर ती गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुणालाही न कळवता भल्या सकाळी राजभवनावर जाऊन केलेला शपथविधी. या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी घेतलेली पहाटेची शपथ म्हणून या घटनेवर राज्याच्या राजकारणात चवीने चर्चा केली जाते. मात्र, आता खुद्द अजित पवारांनीच त्यावर ‘मी पहाटे शपथ घेतलीच नव्हती’, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले. यावेळी विरोधकांकडून अजूनही ‘त्या पहाटे’च्या शपथविधीचं भांडवल केलं जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारताच अजित पवारांनी नेहमीच्या मिश्किल पद्धतीने या प्रश्नावर पत्रकारांनाच उलट चिमटा काढला. त्यावेळी उपस्थित सर्वांमध्येच हशा पिकला.

- Advertisement -

जे सूर्यमुखी..

‘तुम्ही त्याला पहाटे पहाटे म्हणता. सकाळी ८ वाजताच्या शपथविधीला पहाट कसं म्हणू शकता? पहाटे म्हणजे ४ वाजता, ५ वाजता किंवा ६ वाजता असते ती पहाट. सकाळी साडेसहाला अजित पवार मतदारसंघात कामाला सुरुवात करतो. आणि आज नाही करत, गेल्या ३० वर्षांपासून करत आहे. शपथ झाली ती ८ वाजता. पण जे सूर्यमुखी आहेत, त्यांना ती पहाट वाटते. त्याला मी काहीही करू शकत नाही’, अशा शब्दांत अजित पवारांनी पत्रकारांच्या माध्यमातून विरोधकांना देखील कोपरखळी मारली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -