घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी 108 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे करणार अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी 108 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे करणार अनावरण

Subscribe

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईसह देशभराता महाआरती केली जाणार आहे. तसंच, हनुमास चालीसा पटण केलं जाणार आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात भगवान हनुमान मूर्तीचे अनावरण करणार असल्याचे माहिती समोर येत आहे. 108 फुटाच्या हनुमाच्या मूर्तीचे अनावरण मोदीकडून करण्यात येणार आहे.

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईसह देशभराता महाआरती केली जाणार आहे. तसंच, हनुमास चालीसा पटण केलं जाणार आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात भगवान हनुमान मूर्तीचे अनावरण करणार असल्याचे माहिती समोर येत आहे. 108 फुटाच्या हनुमाच्या मूर्तीचे अनावरण मोदीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळं गुजरातमध्ये उद्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमानाच्या 108 फुटी मूर्तीचे अनावरण करणार आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमान मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात मूर्ती उभारण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशभरात भगवान हनुमान चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात उभारण्यात येणारी ही दुसरी मूर्ती आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिली मूर्ती उभारण्यात आली होती. तसेच, दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशाच एका मूर्तीच्या उभारणीचं काम सुरू आहे.

हिंदू पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना खूप खास असतो. या महिन्यापासून हिंदूचे नववर्ष सुरू होते. चैत्र नवरात्री असते. गुढीपाडवा असतो. भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी असते. तसंच श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचा जन्मदिवसही या महिन्यात येतो. चैत्र शुक्ल पौर्णिमा हा हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकिकडं उद्या हनुमान जयंती साजरी केली जाणार असून दुसरीकडे याच मुद्द्यावरून राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्रात मशिदीवरील लाउडस्पीकर काढले गेले नाहीत तर मशिदीसमोर जोरजोरात हनुमान चालीसा वाजविण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेली धमकी आणि त्यावरून राज्यासह देशात चाललेले राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात धार्मिक वादाला वाचा फुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! FD वरील व्याजदरात वाढ, होईल मोठा फायदा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -