घरताज्या घडामोडी'छेडेंगे तो छोडेंगे नही', मशिंदींवरील भोंग्यांवरुन मुस्लिम संघटना PFIची मनसेला धमकी

‘छेडेंगे तो छोडेंगे नही’, मशिंदींवरील भोंग्यांवरुन मुस्लिम संघटना PFIची मनसेला धमकी

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तसेच भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आता पीएफआयकडून थेट धमकी देण्यात आली आहे. आम्हाला छेडाल तर आम्ही सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. राज्यातील एकाही मशिदीला आणि भोंग्याला हात लावाल तर सगळ्यात पुढे पीएफआय असेल अशी धमकी मनसेला देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता मुस्लिम संघटनांकडून मनसेला आव्हान देण्यात येत आहे. मुंब्रामधील पीएफआय संघटनेच्या सदस्याने थेट आव्हानच मनसेला दिलं आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात मनसेकडून हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात येत आहे.

- Advertisement -

पीएफआयच्या सदस्याकडून मनसेला धमकी

पीएफआयच्या संघटनेकडून मुंब्रामध्ये मनसेला उघड आव्हान देण्यात आले आहे. पोलिसांना आवाहन करतो की, ज्या प्रकारे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ज्या प्रामाणे चांगली ठेवली आहे. काही लोक राज्यातील वातवारण बिघडवू पाहत आहेत. काही लोकांना अजानचा त्रास व्हायला लागला आहे. भोंग्यांचा त्रास होत आहे. काही लोकांना मदरशा आणि मशिदींचा त्रास होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो आम्हाला शांती पाहिजे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे. प्रत्येक मजूर आमचा आहे आणि दुसरा एक नारा आहे. जर आम्हाला छेडलं तर आम्ही सोडणार नाही. एकही मदरसा, मशिदींवरील भोंग्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पुढी पीएफआय संघटना दिसेल अशी धमकी पीएफआयच्या सदस्याने दिला आहे.


हेही वाचा : मराठी हृदयसम्राटच्या जागी राज ठाकरेंना ‘हिंदुजननायक’ नवी उपाधी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -