घरदेश-विदेशRam Mandir: विराट-अनुष्काला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, 'या' खेळाडूंचाही समावेश

Ram Mandir: विराट-अनुष्काला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, ‘या’ खेळाडूंचाही समावेश

Subscribe

भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे.

Virat Kohli and Anushka Sharma: भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. मंगळवारी (16 जानेवारी) राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित लोक कोहलीच्या घरी पोहोचले. यादरम्यान विराटने पत्नी अनुष्का शर्मासोबत निमंत्रण पत्र स्वीकारले. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. झारखंडची महिला तिरंदाज दीपिका कुमारीलाही निमंत्रण मिळाले आहे. (Ram Mandir Invitation to Virat Kohli Anushka Sharma Prana Pratishta ceremony Ram Lalla invitation to these players too)

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विराट टीम इंडियासोबत आहे. भारत 17 जानेवारीला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत 22 जानेवारीला होणाऱ्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोहलीला अयोध्येला जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

- Advertisement -

अनेक सेलिब्रिटी आमंत्रित 

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी चित्रपट कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रण मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि धोनी 22 जानेवारीला अयोध्येत पोहोचतील आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी पूर्ण आशा आहे. सचिन-धोनी आणि विराटशिवाय रोहित शर्माही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या सोहळ्याला सुमारे सात हजार लोक उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेत सहभागी होणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी 10 जानेवारी रोजी झारखंडच्या दौऱ्यात सांगितले होते की परदेशातील सुमारे 100 प्रतिनिधींसह सुमारे 7,000 लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

- Advertisement -

(हेही वाचा : Uddhav Thackeray : जनताच ठरवेल शिवसेना कुणाची? ठाकरेंचे नार्वेकर आणि शिंदेंना ‘हे’ खुले आव्हान )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -