घरदेश-विदेशRam Mandir : 'याची देही याची डोळा' अनुभवणार जगभरातील रामभक्त, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा...

Ram Mandir : ‘याची देही याची डोळा’ अनुभवणार जगभरातील रामभक्त, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा

Subscribe

विश्व हिंदू परिषदेने जगभरातील देशांमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्याची योजना तयार केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.

अयोध्या : हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराम प्रभूंच्या मंदिराचे 22 जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यानिमित्ताने राम जन्मभूमी नटललेली आहे. असे असतानाच हा सोहळा प्रत्येक जण आपल्या हृदयात साठवून ठेवण्याची तयारीत करत आहे. परंतु प्रत्येकालाच या सोहळ्याला जाणं शक्य नसल्याने हा सोहळा लाइव्ह केल्या जाणार आहे. परंतु रामभक्त फक्त आपल्या देशात नसून जगभरात असल्याने त्यांच्यासाठीही लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. हा सोहळा तब्बल 160 देशात दिसणार आहे हे विशेष. (Ram Mandir Ram devotees from all over the world will experience the eye of this body Ramlalla Pran Pratishtha ceremony)

विश्व हिंदू परिषदेने जगभरातील देशांमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्याची योजना तयार केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, जगातील 160 देशांमध्ये जिथे हिंदू राहतात तिथे कार्यक्रम लाइव्ह दिसणार आहे. जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळा तेथे थेट दाखवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Congress Vs BJP : कोथरुडमधील गुन्हेगारी भाजपमुळेच! धगेंकर यांचा गंभीर आरोप

50 पेक्षा जास्त देश, जवळपास 500 थेट प्रक्षेपण

विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, अमेरिकेतील 300, ब्रिटनमध्ये 25, ऑस्ट्रेलियात 30, कॅनडात 30, मॉरिशसमध्ये 100 व्यतिरिक्त आयर्लंड, फिजी, इंडोनेशिया आणि जर्मनी अशा 50 हून अधिक देशांमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाणार आहेत. कार्यक्रमांबद्दल सांगायचे तर, शहरातील मंदिरांमध्ये मिरवणूक, हवन पूजा, हनुमान चालीसा पठण आणि प्राणप्रतिष्ठा यांचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची तयारी सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Talathi recruitment : गैरसमजातून गोंधळ झाल्याचा सरकारकडून खुलासा; वाचा सविस्तर

हीसुद्धा घेतली जाणार काळजी

आलोक कुमार यांनी पुढे सांगितले की, जर्मनी सारख्या देशांमध्ये जेथे टाइम झोननुसार वेळ अनुकूल आहे, तेथे ते थेट पाहिले जाईल. अमेरिकेसारख्या देशात जेथे टाइम झोन जुळत नाही, तेथे मंगला आरतीचा कार्यक्रम एकत्रितपणे प्रक्षेपित केल्या जाणार असल्याचेही माहिती त्यांनी यावेळी दिली.

अनेक देशांना निमंत्रण

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फिजी अशा 50 देशांच्या प्रतिनिधींनाही अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर भारतातील 10 कोटींहून अधिक कुटुंबांच्या घरी अक्षता पोहोचविण्यात आल्या आहेत. अलोक कुमार यांनी सांगितले की, आमचे 5 लाख ठिकाणी लाइव्ह स्ट्रिमिंगचे टार्गेट होते, परंतु आता त्यापेक्षा जास्त ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याचे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -