घरक्राइमCongress Vs BJP : कोथरुडमधील गुन्हेगारी भाजपमुळेच! धगेंकर यांचा गंभीर आरोप

Congress Vs BJP : कोथरुडमधील गुन्हेगारी भाजपमुळेच! धगेंकर यांचा गंभीर आरोप

Subscribe

पुण्यातील कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे. मागील अनेक वर्ष कोथरूडमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. ते गुन्हेगार भाजपसाठी काम करतात. त्यामुळे पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी शरद मोहोळच्या हत्येनंतर केला आहे

पुणे : पुण्यातील वाढती गुन्हेगारी स्थानिकांसह सरकारसाठीही डोकेदुखी ठरत आहे. अशातच पुण्यातील कोथरूडमधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काहीच दिवसांपूर्वी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर राज्यात खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. (Congress Vs BJP Crime in Kothrud is because of BJP A serious charge by Dhagenkar)

पुण्यातील कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे. मागील अनेक वर्ष कोथरूडमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. ते गुन्हेगार भाजपसाठी काम करतात. त्यामुळे पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी शरद मोहोळच्या हत्येनंतर केला आहे. तेव्हा धंगेकरांचा निशाणा हा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तर नाही ना? अशीही चर्चा या निमित्ताने रंगत आहे.

- Advertisement -

सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच पुण्यात गुन्हेगारी

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या गुंड शरद मोहोळ याच्या हत्येआधी संपूर्ण राज्याचे लक्षं वेधून घेणाऱ्या ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी (8 जानेवारी) काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणासह पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्यं केलं. यावेळी ते म्हणाले की, पुण्यातील गुन्हेगारीवरुन त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच पुण्यातील गुन्हेगारांची दहशत वाढत असल्याचा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केला. त्यांच्या या आरोपाला आता भाजपकडून कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : राजकारणात नेमके वय किती पाहिजे तसा एक जीआर काढावा, NCPचे अजित पवारांना आवाहन

- Advertisement -

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

कोथरुडसह पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, कोथरुडमध्ये गेली कित्येक वर्षे गुन्हेगारांचं वर्चस्व आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. अनेक निवडणुकांत ते गुन्हेगार भाजपसाठी काम करत असतात. काही गुंड तर भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतात. त्यामुळे पोलीसही त्यांना हात लावत नाहीत. म्हणून कोथरुड भय मुक्त करा, अशांत झालेल्या कोथरूडला शांत करा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -