घरदेश-विदेशउंदीर हत्याकांड : चुकीची कबूली...माफी मागितली, तरीही पोलिसांनी दाखल केला गुन्हा

उंदीर हत्याकांड : चुकीची कबूली…माफी मागितली, तरीही पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Subscribe

नवी दिल्ली : उंदीर मारण्यासाठी (Rat Massacre) न्यायालयाची पायरी चढावी लागेल असा विचार आपण कोणीच करू शकत नाही. पण अशी घटना बिहारच्या बरेलीमध्ये घडली आहे. उंदीर मारल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध बदाऊन पोलिसांनी ३० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे पाच महिने जुने प्रकरण खूप चर्चेत आले आहे.

बदाऊनच्या सदर कोतवाली परिसरात उंदीर मारल्यानंतरही आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो याची कल्पना नव्हती, असे आरोपी मनोजचे म्हणणे आहे. त्याने पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, मी उंदाराला कंटाळलो होतो. उंदराने घरातील अनेक वस्तू कुरतडल्या आहेत. मी स्वत: गरिबीशी सामना करत आहे, पण उंदराने घरातील कपडेही सोडले नाहीत. त्याने माझ्या मुलीच्या हाताला चावा घेतल्यामुळे तिच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च करावा लागला. त्यामुळे उंदीर पकडल्यानंतर मी त्याला दगडाला बांधून नाल्यात फेकून दिल्याचे त्याने सांगितले.

- Advertisement -

गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मनोजने माफी मागितली आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही असे सांगितले. पण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांना आरोपपत्र तयार करण्यासाठी चार महिन्याचा अवधी लागला असून 30 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

असा आहे घटनाक्रम
22 नोव्हेंबर 2022 रोजी कोतवाली परिसरातील पानबरिया येथील रहिवासी मनोज कुमार याने घरातून उंदीर पकडले आणि त्याला दगडाला बांधून घराबाहेरील नाल्यात फेकून दिले. यादरम्यान पीएफएच्या विकेंद्र शर्माने मनोजला हे करताना पाहिले आणि त्याने पोलिसांना बोलावले. विकेंद्रने मनोजविरोधात तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिसांनी आरोपी मनोजला पकडून पोलीस स्टेशनला नेले.
त्यानंतर आयव्हीआरआय बरेली येथे उंदराचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर विकेंद्रच्या तक्रारीवर मनोजविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर मनोजची जामिनावर सुटका करण्यात आली. या घटनेनंतर पाचव्या दिवशी आरोपी मनोज न्यायालयात हजर झाला आणि त्याला तिथेही जामीन मंजूर झाला.

- Advertisement -

प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत होऊ शकते कारवाई
जिल्हा बार असोसिएशनचे सरचिटणीस पवनकुमार गुप्ता यांनी सांगितले की, ज्या मनोजकुमारवर कलमांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे ते जामीनपात्र गुन्हे आहेत. या गुन्ह्यात आरोपीला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगाची शिक्षा होऊ शकते. याआधी उंदीर मारल्याचा आरोप असलेल्या सीओ सिटी आलोक मिश्रा यांच्यावर प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -