घरदेश-विदेशVideo : महिला पोलिसाच पोलीस स्थानकात बॉलिवूड गाण्यावर TikTok

Video : महिला पोलिसाच पोलीस स्थानकात बॉलिवूड गाण्यावर TikTok

Subscribe

पोलीस स्थानकात एका बॉलिवूड गाण्यावर टिक टॉक व्हिडिओ तयार करणे महिला पोलिसाला महागात पडल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे.

भारतामध्ये टिक टॉक अॅप्लिकेशनवरून अनेकदा गदारोळ माजलेला आहे. तरूण पिढी या शॉर्ट व्हिडिओ अॅपच्या आहारी जात असल्याची तक्रार सतत होताना दिसत आहे. अनेकांचा विरोध असला तरी TikTok ची लोकप्रियता काही कमी व्हायला मागत नाही. मात्र, टिक टॉकवर व्हिडिओ करणे एका महिला पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. पोलीस स्थानकात टिक टॉक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर शेअर केल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. या पोलीस महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिचे निलंबन करण्यात आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

गुजरात मधील मेहसाणा जिह्यातील लंघनाज पोलीस स्थानकात कार्यरत असणारी महिला पोलीस अर्पिता चौधरी हिने कामावर असताना टिक टॉक व्हिडिओ तयार केला. लंघनाज पोलीस स्थानकात असलेल्या तुरुंगाच्या समोरच तिने २० जुलै रोजी एका बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करत तो व्हिडिओ टिक टॉकवर टाकला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर या पोलीस महिलेला निलंबित करण्यात आले.

नियमांचे उल्लंघन

अर्पिता चौधरी या पोलीस महिलेने कामावर असताना देखील वर्दी परिधान केली नव्हती. तसेच तिने हा व्हिडिओ पोलीस स्थानकात चित्रीत केला होता. तसेच पोलिसांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. मात्र, तिने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त मंजिता वंझारा यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – TikTok ने फेसबुकला टाकलं मागे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -