घरदेश-विदेशपाणी संकटावर ‘रॉयल’ तोडगा

पाणी संकटावर ‘रॉयल’ तोडगा

Subscribe

 एनफिल्ड करणार ड्राय वॉश

चेन्नईमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांसह कंपन्यांना काम सुरळित ठेवणे कठीण जात आहे. याच संकटाचा सामना करणार्‍या रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटरने वाहने धुण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनांच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार्‍या व्यवस्थेमुळे (ड्राय वॉश) सुमारे १८ लाख लिटर पाण्याची दर महिन्याला बचत होणार आहे. चेन्नईतील परिस्थितीमुळे आम्हाला नवसंशोधनाचा वापर करावा लागला आहे. आमच्या कार्यपद्धतीत कार्यक्षमता आणावी लागली आहे. हे आमचे कायमस्वरुपी ध्येय आहे. या पथदर्शी उपक्रमाची चेन्नईपासून सुरुवात करण्यात येत आहे. त्यानंतर हा उपक्रम तामिळनाडूतील शहरात करण्यात येणार आहे,असे रॉयल एनफील्डचे मुख्य व्यवसाय प्रमुख शाजी कोषी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे ड्राय वॉश?

ड्राय वॉश हे चांगले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे वाहनाच्या स्वच्छतेत तडजोड न करता पाण्याची कमी गरज लागते. तसेच वाहनांची स्वच्छता करण्यासाठी कमी वेळ लागतो. रॉयल एनफील्डचे देशातील ६०० हून अधिक शहरांत ९०० वर्कशॉप आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -