घरदेश-विदेशRussia Ukraine War : युरोपातील सर्वात मोठ्या अणु उर्जा प्रकल्पातून निघाले धुराचे...

Russia Ukraine War : युरोपातील सर्वात मोठ्या अणु उर्जा प्रकल्पातून निघाले धुराचे लोट; चेर्नोबिलपेक्षा 10 पटीने मोठा स्फोट, युक्रेनचा दावा

Subscribe

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, रशियन हल्ल्यामुळे चेर्नोबिल अणु प्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी 20 पट वाढली होती. ही पातळी खूप उच्च आहे, परंतु गंभीर नाही. युक्रेनने म्हटले की, रशियन हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गी धूळ सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे रेडिएशनची पातळी खूप वाढली आहे.

रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. (Russia-Ukraine War). गेल्या 9 दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात युक्रेनमधील 10 शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 1 कोटी नागरिकांनी देश सोडला आहे. दरम्यान युक्रेनमधील Zaporizhzhia Oblast प्रांतातील एनरहोदर शहरात रशियाने मोठा बॉम्बब्लास्ट घडून आणल्याचे वृत्त आहे.
यावर युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दावा केला की, या बॉम्ब हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रातून धुराचे लोट उठताना दिसले. आग लागल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ले थांबवण्याचे आवाहन युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी (Zaporizhzhia Nuclear Plant) रशियन सैन्याला केले. कुलेबा यांनी ट्विट केले, “जर हा भडका उडाला तर ते चेर्नोबिलपेक्षा 10 पटीने मोठा स्फोट घडेल, त्यामुळे रशियन सैन्याने ही आग ताबडतोब थांबवावी पाहिजे.”

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने युक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने मोठी बातमी दिली आहे की, युरोपच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पातून (झापोरिझ्झ्या न्यूक्लियर प्लांट) धूर निघताना दिसत आहे. वास्तविक, Zaporizhzhia ते एनरहोदर हे अंतर फक्त 122 किमी आहे. Enerhodar, Nikopol आणि Chervonohryhorivka च्या समोर, Kakhovka जलाशयाजवळ नीपर नदीच्या डाव्या तीरावर स्थित आहे.

- Advertisement -

युक्रेनमधील Zaporizhzhia न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये 6 अणुभट्ट्या आहेत, हे संपूर्ण युरोपमधील सर्वात मोठे आणि पृथ्वीवरील 9 व्या क्रमांकाचे अणु ऊर्जा केंद्र आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशिया सध्या मोर्टार आणि आरपीजीने हल्ला करत आहे. ऊर्जा केंद्राच्या काही भागांना सध्या आग लागली आहे. मात्र आग विझवणाऱ्या युक्रेनियन अग्निशमन दलाच्या जवानांवर रशियन सैन्याकडून गोळीबार केला जातोय.

यापूर्वी, युक्रेनियन लष्करी तज्ञ अण्णा कोवालेन्को यांच्या म्हणण्यानुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्याने चेर्नोबिल (Chernobyl Nuclear Plant) अणु प्रकल्प ताब्यात घेतला होता. याशिवाय रशियन सैन्याने रेडिएशन मॉनिटरिंग स्टेशनवरील कामगारांना ओलीस ठेवले. हे कर्मचारी मॉनिटरिंग स्टेशनवर रेडिएशनची पातळी पाहत राहतात. यासोबतच रेडिएशन सुरक्षित पातळीवर ठेवण्याची जबाबदारीही त्यांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, रशियन हल्ल्यामुळे चेर्नोबिल अणु प्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी 20 पट वाढली होती. ही पातळी खूप उच्च आहे, परंतु गंभीर नाही. रशियन हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गी धूळ सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे रेडिएशनची पातळी खूप वाढली आहे.


Russia Ukraine War : “माझ्यासोबत बसून चर्चा करा”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून पुतिन यांना थेट चर्चेचे आवाहन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -