घरमहाराष्ट्रनाशिकपेठ तालुक्यात खैरलाकडाची तस्करी रोखली

पेठ तालुक्यात खैरलाकडाची तस्करी रोखली

Subscribe

पोलीसांनी खैर प्रजातींचे एकूण १५ लाकडे जप्त केली

नाशिक : पेठ तालुक्यातील आंबास गावाजवळ गुरुवारी (दि.३) सकाळी ८ वाजता वन विभागाच्या पथकाने सापळा रचून खैर प्रजातीच्या लाकडांनी भरलेली पिकअसह चोरट्या मार्गाने तस्करी होणारे खैर प्रजातींचे १५ लाकडे जप्त केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. जाधव, ए. आर. अजेस्त्र यांना गुरुवारी (दि.३) सकाळी ८ वाजता खैर लाकडांच्या तस्करीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. वनसंरक्षण गस्तीदरम्यान पेठ तालुक्यातील आंबास गावाजवळ खैर प्रजातीच्या लाकडांनी भरलेली महिंद्रा पिकअप (एमएच ११-टी ५३६९) सापळा रचून अडवली.

- Advertisement -

पथकाने पिकअपची तपासणी केली असता खैर प्रजातीचे १५ नग दिसून आले. पथकाने पिकअपसह १५ नग जप्त केले. ही कारवाई वनपाल एस. एच भारोटे, एच. बी. राऊत, पी. पी. तायडे, बी. पी. तायडे, सी. जे. चौरे, एस. के. बोरसे, एम. जी. वाघ, आर. ए. गवळी, वनरक्षक एम. व्ही. विसपुते, वाहन चालक हेमंत भोये, पोलीस हवालदार हेमराज गवळी यांनी केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -