घरदेश-विदेशSatya Nadella Son Died : मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नाडेला यांच्या मुलाचे निधन,...

Satya Nadella Son Died : मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नाडेला यांच्या मुलाचे निधन, जन्मापासून होता ‘हा’ आजार

Subscribe

जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या मुलाचे निधन झाले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटवे की, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलाआणि त्यांच्या पत्नी अनु यांचा मुलगा झैन नाडेला यांचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे. तो केवळ 26 वर्षांचा होता. मात्र जन्मापासूनचं त्याला सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होता.

सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या कार्यकारी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे सांगितले की, जैन यांचे निधन झाले आहे. मेसेजमध्ये अधिकाऱ्यांना नाडेला कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

नाडेला यांचे डिसएबिल यूजर्सला सेवा देण्यावर जोर

मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला यांनी 2014 पासून अपंग युजर्संना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी डिझाइनिंग प्रोडक्ट्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा जैन यांचे पालन पोषण, संगोपन करताना त्यांने बरेच काही शिकले आहे. सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून गेल्या वर्षी, चिल्ड्रन हॉस्पिटलने नाडेला यांच्यासमवेत पेडियाट्रिक न्यूरोसायन्सेसमध्ये झैन नाडेला एंडॉव्ड चेअरची स्थापना केली.

- Advertisement -

चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्पॅरिंग यांनी त्यांच्या बोर्डाला दिलेल्या मेसेजमध्ये लिहिले की, “झैनची उत्कृष्ट संगीताची जाणीव, त्यांचे तेजस्वी स्मित आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांना दिलेला आनंद नेहमी लक्षात ठेवला जाईल.” हा मेसेज मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यात आला होता.


Lock Upp : 4 वर्षांचा मुलगा कविशने करणबद्दल विचारले अन् निशा रावलने दिले हे उत्तर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -