घरमनोरंजनLock Upp : 4 वर्षांचा मुलगा कविशने करणबद्दल विचारले अन् निशा रावलने...

Lock Upp : 4 वर्षांचा मुलगा कविशने करणबद्दल विचारले अन् निशा रावलने दिले हे उत्तर

Subscribe

कंगना राणौतच्या ‘ लॉक अप’ या रिअॅलिटी शोच्या नव्या एपिसोडमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शोमध्ये एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकांनी पहिल्याच दिवशी शोचा पारा आणखीनच वाढवला आहे. प्रेक्षकांनाही स्पर्धकांमधली वादावादी बघायला मिळाली, तर कुणी मन मोकळेपणाने आपले अनुभव शेअर करताना दिसले. या शोमध्ये करणवीर बोहरा आणि निशा रावल आपापसात बोलत होते, यावेळी निशा तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक आठवणी, अडचणींचा खुलासा करताना दिसली. तिने सांगितले की, कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडली तेव्हा त्यांचा मुलगा कविश 4 वर्षांचाही नव्हता.

यावर करणवीर बोहराने निशा रावलला विचारले की, तुझा मुलगा कविश वडील करण मेहराबद्दल कुठे आहेत असं विचाल्यावर काय सांगते? यावर निशाने उत्तर दिले की, ‘तो क्वचितच त्याच्याबद्दल विचारतो, कारण त्याचे वडील नेहमी दुसऱ्या शहरात शूटिंगसाठी बाहेर असतात. तो नेहमी त्याच्या संपर्कात नव्हता. तसेच ते रोज एकमेकांशी फोनवरही बोलत नव्हता.

- Advertisement -

यावर निशा पुढे म्हणते की, ‘जे काही क्षण होते, ते बहुतेक मीच घडवून आणले होते. मी त्याला माझ्या शेजारी बसायला सांगायची. ती त्याच्याशी बोलायला लावायची. ती त्याला सांगायची की तू निघून जाशील, आत्ता तरी फोन बाजूला ठेवून बोल मुलासोबत. जेव्हा कविश मला विचारतो की, बाबा कुठे आहे आणि तो कॉल का करत नाही, मी वाट पाहत आहे. त्यावेळी कविशला मी सांगायची की, मला माफ करा, पण तुझी आई नेहमी तुझ्याबरोबर असते. मीच तुझी आई आणि मीच वडील आहे.’

निशा पुढे करणवीरला सांगते की, कविशला तिच्या आणि करणच्या नात्याबद्दलच्या नकारात्मक गोष्टी माहित नाहीत. जेव्हा तो त्याच्या वडिलांबद्दल बोलतो तेव्हा ती नेहमी त्याच्याबद्दल चांगले बोलते. ती सांगते की, ‘मला असेही वाटते की, तो नीट व्यक्त करू शकणार नाही, म्हणून मला त्याच्याशी व्यवहार करण्यासाठी बिहेविअर थेरपिस्ट हवा आहे, कारण ते दररोज अशा प्रकरणांना सामोरे जातात. एका थेरपिस्टने मला सांगितले होते की, हळूहळू त्याचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे कविशला काही गोष्टी सांगण्यास सांगितले. पण त्याला कोणत्याही नकारात्मक गोष्टी माहित नाहीत.

- Advertisement -

अभिनेत्री पुढे म्हणते, ‘जेव्हा तो त्याच्या वडिलांबद्दल बोलतो तेव्हा मी त्याला मिठी मारते. मग मी त्याच्याशी बसून बोलले आणि प्रोत्साहन देते. माझा नेहमीच असा विश्वास आहे की, मुलं जन्माला घालण्यासाठी दोन लोक लागतात, म्हणून त्याला वाढवायलाही फक्त दोनच लोक लागतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येतात तेव्हा त्या एकट्याला झेलाव्या लागतात. ठीक आहे. तुम्ही शिका आणि सुधारा.’

यावर करणवीर सरते शेवटी सांगतो की, निशा रावलने ‘लॉकअप’ करण्याचा निर्णय घेतला हा अतिशय शहाणपणाचा निर्णय होता. हा शो ‘पैसा शक्ती, स्वातंत्र्य आणि जबाबदारी देतो, म्हणूनच आजच्या महिलांचा आवाज आहे. येत्या काही वर्षांत भारतात विवाहाचं प्रमाण फारच कमी होणार आहे, कारण पुरुष स्त्रीचे स्वातंत्र्य सांभाळू शकत नाही. तो नाहीच सांभाळू शकत.

2021 मध्ये निशा रावल आणि करण मेहरा यांच्या आयुष्यात खूप वाईट वळण आले होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर 31 मे 2021 रोजी निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. निशाने करणवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता आणि त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोपही केला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -