घरदेश-विदेशसौदी अरेबिया भारताला करणार इंधन पुरवठा

सौदी अरेबिया भारताला करणार इंधन पुरवठा

Subscribe

सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा इंधन पुरवठादार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात सौदी अरेबियाकडून भारताला चार दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला जाणार आहे. सौदी अरेबियाने जादाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, त्यांना कच्च्या इंधन तेलाचे उत्पादन वाढवायचे असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणकडून इंधन घेणारा भारत हा चीननंतरचा दुसरा मोठा देश आहे. मात्र इराणशी व्यवहार करणाऱ्या सर्व देशांवर बहिष्कार टाकण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. ओपेक देशामधील इंधनाचे उत्पादन करणारा इराण हा तिसरा सर्वात मोठा देश आहे. आता सौदी अरेबियाने भारताला इंधन पुरविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताल इंधनाच्या अडचणीतून थोडीसा दिलासा मिळणार आहे.

रिलायंस इंडस्ट्रिज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प, भारत पेट्रोलियम कॉर्प आणि मँगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने सौदी अरेबियाकडून नोव्हेंबर महिन्यात १ दशलक्ष बॅरल इंधन देण्याची मागणी केली असल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अमेरिकेने इराणकडून इंधन घेण्यासाठी निर्बंध घातले असले तरी भारतातील काही रिफायनरींनी नोव्हेंबर महिन्यासाठी ९ दशलक्ष बॅरल इंधनाची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -