घरदेश-विदेशSBI Clerk Prelims Result 2021: एसबीआयच्या क्लर्क प्रीलिम्सचा निकाल जाहीर, असा तपासा...

SBI Clerk Prelims Result 2021: एसबीआयच्या क्लर्क प्रीलिम्सचा निकाल जाहीर, असा तपासा ऑनलाईन निकाल

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियाने ( State bank of India) क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट 2021 (SBI Clerk prelims result 2021) जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी बसलेले उमेदवाऱ SBI च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. तसेच या प्रीलिम्स परीक्षेत उर्त्तीर्ण झालेले उमेदवार आता पुढील मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करु शकतात. एसबीआयने SBI junior Associate Post साठी ही परीक्षा घेतली होती.

प्रीलिम्स परीक्षेच्या निकालानंतर उमेदवारांसाठी आता मुख्य परीक्षा १० जुलै २०२१ पर्यंत आयोजित केली आहे. ही परीक्षा २ तासांची असते. यात विद्यार्थ्यांना २०० प्रश्नांची उत्तरे द्याली लागतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ मार्क कापला जाईल.

- Advertisement -

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी वेबसाईट लिंक 

  1. https://sbi.co.in/ 

असा पाहा प्रीलिम्स परीक्षेचा ऑनलाईन निकाल?

१) सर्वप्रथम sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.ट

२) यानंतर वरच्या बाजूस दिसणाऱ्या Careers ऑप्शनवर क्लिक करा.

- Advertisement -

३) पुढे SBI junior associate post Result वर क्लिक करा.

४) याठिकाणी विचारलेली डिटेल्स टाकून Login करा.

५) तुमचा SBI Clerk Prelims Exam Result 2021 समोर दिसेल. तो डाउनलोड करा आणि सेव्ह करुन ठेवा.

या भरतीमध्ये एकूण ५२३७ पदांसाठी अर्जदारांची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त उमेदवार Junior Associate या पदासाठी काम करतील. मात्र प्रीलिम्स परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी अशा फेऱ्या पार कराव्या लागणार आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -