घरदेश-विदेशदिल्ली, मुंबईसह पाच शहरं हाय अलर्टवर

दिल्ली, मुंबईसह पाच शहरं हाय अलर्टवर

Subscribe

भारतीय हवाई दलाने पकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भारतातील दिल्ली, मुंबईसह पाच राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हल्ला करुन पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने केलेल्या या एइर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे २०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा आणि दोन भाऊ मारले गेले आहेत. त्याशिवाय, जैशचे मोठमोठे दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. पुढचे ७२ तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असे सांगण्यात आले आहे. काश्मीरमध्ये काही दहशतवादी लपून बसले आहेत. ते सध्या कोणत्याही हल्ल्यासाठी सज्ज असू शकतात. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

दहशतवाद विरोधा कारवाईसाठी सज्ज

पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात देशाचे ४० पेक्षा दास्त जवान शहीद झाले होते. काल सकाळी भारतीय वायूसेनेने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील दिल्ली, मुंबईसह पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. यामध्ये पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजनाथ सिंह यांनी बोलावली बैठक

काल पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये लपून बसलेल्या अतिरक्यांनी समजा हल्ला केला तर त्याचा सामना कसा करायचा, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी बैठकीत घेरले पाकिस्तानला

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -