घरदेश-विदेशमहाराष्ट्रात एकत्रितपणे लढत सांप्रदायिक शक्तीला दूर ठेवले - शरद पवार

महाराष्ट्रात एकत्रितपणे लढत सांप्रदायिक शक्तीला दूर ठेवले – शरद पवार

Subscribe

देशात सर्वसामान्य जनतेच्या मनात लोकशाहीबाबत एक श्रद्धा आहे. देशातील जनतेत लोकशाहीच्या रूजलेल्या विचारामुळेच हे शक्य झाले आहे. सगळ्या लोकांच्या मनात सांप्रदायिक शक्तीला दूर ठेवण्याचाच विचार सुरू आहे. या विचाराची सुरूवात होत आहे. महाराष्ट्रात भाजपची गेल्या पाच वर्षात सत्ता होती. आम्ही विरोधी पक्षातील सर्वांनी एकत्र येऊन अशाच सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवले आहे. महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन लोकांना एक पर्याय दिला आहे. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आणीबाणीच्या काळात देश वेगळ्याच परिस्थितीला सामोरा गेला. पण या देशातल्या सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीविषयी खूप विश्वास आहे. आणीबाणीनंतर जनतेला संधी मिळाली तेव्हा जनतेने आपली ताकद मतपेटीतून दाखवली आणि इंदिरा गांधींना सत्तेपासून दूर ठेवल्याची आठवण त्यांनी करून दिली. देशभरात सध्या सुरू असलेली परिस्थिती पाहता शरद पवारांनी केलेले विधान अतिशय सूचक असे मानले जाते आहे.

एकच विचार आणि एकाच संघटना देशाचा कारभार चालवत असेल तर काही ना काही समस्या उद्भवतात. यामुळे देशाला मार्ग दाखवण्यासाठी समाजवादी विचारांची शक्ती जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशात समोर आली होती. यानंतर देशात एका विचारातून अनेक संघटना पुढे आल्या आणि मजबूत झाल्या. यात समाजवादी विचारांवर श्रद्धा असणारे नेते तरूण वर्गाला आकर्षित करत होते. त्यानंतर अनेक समाजवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्टया नेत्यांचे संघटन देशात जन्मास आले. आणीबाणीच्या काळात देश एक वेगळ्याच परिस्थितीला सामोरे गेला. पण देशात जनतेच्या मनात लोकशाहीविषयी खूप विश्वास आहे. आणीबाणीनंतर जनतेला संधी मिळाली तेव्हा जनतेने आपली ताकद दाखवली आणि इंदिरा गांधी यांनी सत्तेपासून दूर ठेवले असेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -