घरदेश-विदेश'ट्विटर'मुळे सापडले बाबा

‘ट्विटर’मुळे सापडले बाबा

Subscribe

ट्विटरवर बरेच लोक मोठमोठ्या नेतेमंडळींना टॅग करुन आपल्या समस्यांचे निवारण करतात. मग यात रेल्वेमंत्र्यांना विचारलेले जाब असोत किंवा मुंबई पोलिसांकडून मांगितलेली मदत. एवढंच काय, तर लोक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही ट्विटरवर संवाद करतात. ट्विटर हे संकटसमयी बचाव करण्याचे एक महत्वाचे साधन बनले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंबईत राहणाऱ्या तमन्ना गुप्ताला आपल्या वडिलांना शोधण्यात आलेले यश.

तमन्नाने ट्विटरवर केली होती पोस्ट

तमन्ना गुप्ता या मुंबईत राहणाऱ्या तरुणीने ट्विटरवर ‘फाइंड माय फादर’ असा हॅशटॅग लावून वडिलांना शोधण्यासाठी मदत मांगितली होती. तिचे ६६ वर्षीय वडील राधेश्याम गुप्ता हे शुक्रवार(१जून) पासून हरवले होते. मुंबईच्या नालासोपारा भागात त्यांना शेवटचं बघितले असल्याचं काही लोकांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर आपले वडील झेरॉक्सवाले काका म्हणूनही प्रसिद्ध असल्याचं तिने ट्विटरच्या पहिल्या पोस्टमध्ये सांगितलं होतं.

- Advertisement -

तमन्नाला वडिलांचा आला फोन

या सर्व प्रयत्नांना अखेर यश आलं. एके दिवशी अचानक तमन्नाला तिच्या वडिलांचा फोन आला. तेव्हा मथुराच्या गोवर्धन भागात आपण असल्याचं तिच्या वडिलांनी तिला सांगितलं. ही गोष्ट तमन्नाने लगेच ट्विटवर पोस्ट केली. शिवाय आपण माझ्या वडिलांची मदत करु शकता का? अशा शब्दांत नेटिझन्सला तिने आवाहनही केलं. या ट्विटमध्ये तमन्नाने मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांसोबतच युपीच्या सीएम ऑफिसलाही टॅग केलं. तमन्नाच्या या ट्विटनंतर लगेच गोवर्धन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, ” मथुराच्या सर्व पोलीस स्थानकांना यासंदर्भात सूचित करण्यात आलं असून राधेश्याम गुप्ता यांचा फोटोही पाठवण्यात आला आहे.”

- Advertisement -


वडील सापडल्याची बातमीही दिली ट्विटरवर

वडील सापडल्याचं तमन्नाने ट्विटरवर सांगून सगळ्यांचे आभार मानले. यासाठी तिने डिजिटल इंडियाचे आभार मानत पीएमओला देखील टॅग केले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -