घरदेश-विदेशकर्नाटक उच्च न्यायालयातील 6 न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी 

कर्नाटक उच्च न्यायालयातील 6 न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी 

Subscribe

बंगळुरू | कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या मोबाईल नंबरवर फोन करून देण्यात आल्याच प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी के मुरलीधर यांना 12 जुलैला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या फोनवरून त्या व्यक्तीने मुरलीधर यांना न्यायधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली. या व्यक्तीने मुरलीधर यांच्या कार्यालयीन व्हॉट्सअॅपवर नंबरवर धमकीचा मेसेज देखील पाठविला. या मेसेजमध्ये पाकिस्तानमधील एबीएल बँकेतील खात्यात 50 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. बँक खात्यात पैसे जमा न केल्यास कर्नाटकातील उच्च न्यायालयात सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – धार्मिक भावना दुखावणारा म्हणतो की, माझ्यावरील दाखल गुन्हे रद्द करा

कर्नाटक उच्च न्यायालयात मोहम्मद नवाज, एचटी नरेंद्र प्रसाद, एचपी संदेश, अशोक निजगन्नानवर, के नटराजन आणि वीरप्पा ही न्यायधीश आहेत. या अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज हा हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये पाठविले होते. या अज्ञात व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -