घरमहाराष्ट्रपुणेMonsoon Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Monsoon Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Subscribe

यंदा राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असून 106 टक्के पाऊसांची नोंद झाली आहे. राज्यात यंदा 1 जूनपासून ते 24 जुलैपर्यंत 485.10 मिमीपर्यंत पोहोचली आहे.

मुंबई | यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली असली, तरी राज्यात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. यामुळे राज्यातील विविध भागातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही भागात पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भ आणि महाठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर हवामान विभागने राज्यातील सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यात मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

यवतमाळ जिल्हयातील मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळमध्ये अतिमुसळधार पाऊसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला आहे.

हेही वाचा – मुंबईसह उपनगरात उद्या पावसाचा जोर; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

- Advertisement -

राज्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊसांची नोंद

यंदा राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असून 106 टक्के पाऊसांची नोंद झाली आहे. राज्यात यंदा 1 जूनपासून ते 24 जुलैपर्यंत 485.10 मिमीपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांत सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला असून 7 जिल्ह्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -