घरदेश-विदेश'सॉरी, मला लेट झाला...', 10 मिनिटे उशीर झाल्याने सरन्यायाधीशांनी कोर्ट रूमची मागितली...

‘सॉरी, मला लेट झाला…’, 10 मिनिटे उशीर झाल्याने सरन्यायाधीशांनी कोर्ट रूमची मागितली माफी

Subscribe

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड (CJI DY Chandrachud) हे अतिशय शिस्तप्रिय न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. अत्यंत वक्तशीरपणा हा त्यांचा एक गुण आहे. थोडा उशीर जरी झाला तर लगेच माफी मागण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. कोर्ट रूममध्ये जाण्यास अवघे 10 मिनिटे उशीर झाल्यावर त्यांनी सर्वांची माफी मागितली.

एक दिवस सरन्यायाधीश चंद्रचूड यांना कोर्ट रूममध्ये पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाला. कोर्ट रूममध्ये पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागितली. ‘माफ करा, मी सहकारी न्यायमूर्तींसोबत चर्चा करत होतो… त्यामुळे उशीर झाला,’ असे ते म्हणाल्याचे वृत्त ‘द वीक’ने (The Week) दिले आहे. एवढ्याशा विलंबाकरिता सरन्यायाधीशांनी माफी मागितल्याने त्यांचा वक्तशीरपणा आणि नम्रपणा अधोरेखित झाला. ही घटना काही महिन्यांपूर्वीची आहे. भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना कोर्ट रूममध्ये जायला विलंब झाला होता.

- Advertisement -

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती प्रदीप कुमार सिंह यांनी एका मीडिया ग्रुपला दिलेल्या निवेदनात, न्यायमूर्ती चंद्रचूड हे खूप शिस्तप्रिय आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करणारे आहेत. इतरांनी देखील वेळेचे महत्त्व जाणून न्यायालयात उपस्थित राहिले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती प्रदीपकुमार सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

सत्य सांगण्यास न्यायमूर्ती चंद्रचूड मागेपुढे पाहत नाहीत आणि हसतहसत सत्य सांगतात. त्याची ही खासियतच त्यांचे वेगळे आणि साधे सरळ व्यक्तिमत्व असल्याचे स्पष्ट करते, असे त्यांचे सहकारी न्यायमूर्ती सांगतात.

वेळेचे नियोजन महत्त्वाचे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करतात. खुद्द सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली. आम्ही न्यायालयाच्या वेळेत म्हणजे सकाळी 10:30 ते दुपारी 4 या वेळेत आम्ही जे काम करतो, ते आमच्या कामाचा एक छोटासा भाग आहे. दुसर्‍या दिवशी ज्या खटल्यांची आम्हाला सुनावणी घ्यायची असते, त्याची तयारी करण्यासाठी देखील तेवढाच वेळ लागतो. राखून ठेवलेले निर्णय शनिवारी तयार केले जातात तर, रविवारी सोमवारच्या खटल्यांसाठी तयारी करावी लागते, असे त्यांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -