घरक्राइमकोझिकोड सहप्रवाशाला पेटवल्याप्रकरणातील आरोपीला रत्नागिरीतून अटक

कोझिकोड सहप्रवाशाला पेटवल्याप्रकरणातील आरोपीला रत्नागिरीतून अटक

Subscribe

चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशाला आग लावल्याची धक्कादायक घटना केरळमधील कोझिकोडमध्ये घडली. रविवारी ही घटना घडली. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले. याप्रकरणी केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशाला आग लावल्याची धक्कादायक घटना केरळमधील कोझिकोडमध्ये घडली. रविवारी ही घटना घडली. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले. याप्रकरणी केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शाहरुख सैफिला असे या आरोपीचे नाव असून, त्याला रत्नागिरी स्थानकातून अटक करण्यात आली आहे. (Accused in Kozhikode case of setting a fellow passenger on fire arrested from Ratnagiri)

मिळालेल्या महितीनुसार, केंद्रीय गुप्तचर (Central Intelligence) यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra ATS) संयुक्त पथकाने कोझिकोड रेल्वे आग (Kozhikode Train Fire) प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आरोपी शाहरुख सैफिला हा नोएडाचा रहिवाशी आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केरळ पोलिसांचे एक पथकही रत्नागिरी येथे दाखल झाले आहे. आरोपीला लवकरच केरळ पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेन कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर आली असता एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यावर ज्वलनशील द्रव टाकून आग लावली, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली त्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला आणि याचाच फायदा घेत आरोपीने तेथून पळ काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) दिली. त्यानंतर आरपीएफने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात आली. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

काही प्रवाशांनी या घटनेनंतर एक महिला आणि एक मूल हरवल्याची तक्रारही केली. त्यानंतर शहर पोलिसांनी रुळांची पाहणी करून महिला आणि लहान मुले आणि एका मध्यमवयीन पुरुषासह तीन मृतदेह बाहेर काढले. मुलाचे वय एक वर्ष होते. आग लागल्याचे पाहून एकतर ते रेल्वेतून पडले किंवा त्यांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी बॅगेतील बाटलीत पेट्रोल घेऊन जात असल्याने ही घटना पूर्वनियोजित असावी. एका रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या व्यतिरिक्त काही इतर तपास यंत्रणा देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा काही दहशतवादी कारवाईशी संबंध आहेत का याबाबत ते तपास करत आहेत. सध्या इतर कोणतीही अधिक माहिती जारी केली जाऊ शकत नाहीत. तपास सुरू आहे.


हेही वाचा – धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग; तिघांचा मृत्यू, 9 जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -