घरदेश-विदेशSputnik लस लवकरच सरकारी लसीकरण केंद्रांवर होणार उपलब्ध; अधिकाऱ्यांची माहिती

Sputnik लस लवकरच सरकारी लसीकरण केंद्रांवर होणार उपलब्ध; अधिकाऱ्यांची माहिती

Subscribe

देशभरातील कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि रशियन लस स्पुतनिक व्ही या तीन कोरोनाच्या लसींमुळे महामारीदरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे. देशातील रशियन कोविड लस स्पुतनिक व्हीच्या वापरास केंद्रीय संशोधन संस्था, केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर आता स्पुतनिक-व्ही लस लवकरच सरकारी लसीकरण केंद्रांवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि रशियन लस स्पुतनिक व्ही ही लस भारतीयांना देण्यात येणार आहे.

- Advertisement -

लवकरच स्पुतनिक व्ही ही लस लोकांना सरकारी लसीकरण संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती केंद्राचे कोविड -१९ चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी दिली. ते असेही म्हणाले, सध्या स्पुतनिक-व्ही खासगी क्षेत्रावर उपलब्ध आहे. त्याचा पुरवठा लक्षात घेता आम्ही या स्पुतनिक-व्ही लसीला लवकरच लसीकरण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्पुतनिक व्ही लसीला १८ डिग्री सेल्सिअस तपमान आवश्यक आहे. अरोरा यांच्या मते, देशातील ग्रामीण भागात ही लस पोहोचविणे हेच प्रमुख उद्दीष्ट आहे. ते म्हणाले की, सध्या कोरोना लसीकरण संथ गतीने होताना दिसत असले तरी येत्या आठवड्यात पुन्हा एकदा वेगवान होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आकडेवारीनुसार आतापर्यंत देशभरात ३४ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जुलैअखेरपर्यंत १२ ते १६ कोटी लसीचे डोस दिले जाणार आहे. केंद्राने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की जुलै महिन्यापर्यंत ५० कोटी डोस देण्यात येण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

या आठवड्यात भारतात येणार Moderna ची लस

दरम्यान, अमेरिकेची कोरोना लस मॉडर्ना येत्या काही दिवसांत भारतात दाखल होणार आहे, अशी माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सने दिली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने असेही सांगितले की, मॉडर्नाची लस या आठवड्यात भारतात उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै पर्यंत देशातील काही प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये मॉडर्नाची लस उपलब्ध होणार असून ती नागरिकांना घेता येणार आहे. मात्र मॉडर्ना लसीच्या पहिल्या बॅचमध्ये लसीचे किती डोस असतील याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि रशियन लस स्पुतनिक व्ही नंतर मॉडर्नाची लस ही कोरोना संसर्ग नियंत्रणात आणणारी चौथी लस असणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -