घरमहाराष्ट्रMaharashtra monsoon session 2021 : विरोधकांच्या अनुपस्थितीत विधानसभेत सात विधेयके मंजूर

Maharashtra monsoon session 2021 : विरोधकांच्या अनुपस्थितीत विधानसभेत सात विधेयके मंजूर

Subscribe

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा कामकाजावर सोमवारी बहिष्कार टाकला. ती संधी साधत आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी अवघ्या ३० मिनिटांत तब्बल सात विधेयके मंजूर केली.

आज ओबीस आरक्षणाबाबतच्या ठरावादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा संघर्ष झाला. त्यात विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी एक वर्षासाठी निलंबन जाहीर केले. या निर्णयाविरोधात भाजपच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.

- Advertisement -

दरम्यान, सभागृहाचे कामकाज विषयपत्रिकेनुसार पार पाडण्यात आले. त्यात सात विधेयके एकमताने मंजूर करण्यात आली. ही सर्व विधेयके पुर:स्थापनार्थ असून सुधारणा विधेयके होती. विधेयकावर चर्चा अपेक्षित असते. कोणत्याही सदस्यास विधेयकावर बोलण्यास वेळेचे बंधन नसते.

मंजूर झालेली विधेयके :

१. महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण आणि जतन (सुधारणा) विधेयक २०२१
२. महाराष्ट्र परगणा आणि कुळकर्णी वतने, मुलकी पाटील पद रद्द करणे, सेवा इनामे रद्द करणे (सुधारणा) विधेयक २०२१
३. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक २०२१
४. महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) विधेयक २०२१
५. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) विधेयक २०२१
६. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२१
७. अॅटलस स्कीलटेक विद्यापीठ, मुंबई विधेयक २०२१.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -