घरदेश-विदेशश्रीलंका बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना भारतातून ट्रेनिंग

श्रीलंका बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना भारतातून ट्रेनिंग

Subscribe

श्रीलंकेत स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना काश्मीर आणि केरळमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी काश्मीर, केरळ आणि बंगळूरू असा प्रवास देखील केला असल्याचे उघड झाले आहे.

श्रीलंकेला साखळी बॉम्बस्फोटाने हादरवणाऱ्या दहशतवाद्यांना भारतातून ट्रेनिंग दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना काश्मीर आणि केरळमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी काश्मीर, केरळ आणि बंगळूरू असा प्रवास देखील केला असल्याचे उघड झाले आहे. श्रीलंकेचे लष्करप्रमुख महेश सेनानायके यांनी ही माहिती उघड केली आहे.

हल्लेखोरांना भारतातून ट्रेनिंग

२१ एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका ८ साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या बॉम्बस्फोटामध्ये २५० पेक्षा अधिक जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटा प्रकरणी श्रीलंका पोलिसांनी १०० पेक्षा अधिक संशयितांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास श्रीलंका लष्कराकडून सुरु आहे. दरम्यान. श्रीलंका लष्कराचे प्रमुख महेश सेनानायके यांनी दावा केला आहे की, ज्या दहशतवाद्यांनी श्रीलंकेत बॉम्बस्फोट केले होते त्यांना भारतामध्ये ट्रेनिंग देण्यात आले होते. या दहशतवाद्यांना काश्मीर आणि केरळमध्ये ट्रेनिंग देण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी या दहशतवाद्यांनी काश्मीर ते केरळ आणि बंगळुरु असा प्रवास सुध्दा केला होता.

- Advertisement -

दुसऱ्या देशातील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते

दरम्यान, या दहशतवाद्यांचा भारतामध्ये जाण्याचा नेमका उद्देश काय होता याची माहिती नसल्यायाचे सेनानायके यांनी सांगितले. मात्र श्रीलंकेमध्ये मोठया प्रमाणावर घातपात घडवून आणण्यासाठी तसेच परदेशातील दहशतवाद्यांबरोबर संपर्क करता यावा यासाठीच या दहशतवाद्यांनी हे प्रशिक्षण घेतल्याचे सेनानायके यांनी सांगितले आहे. मात्र हल्ला करण्यापूर्वी या दहशतवाद्यांनी दुसऱ्या देशातल्या दहशतवादी संघटनेची भेट घेतली होती. तसंत ते त्या संघटनांच्या देखील संपर्कात होत्या असे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -