घरदेश-विदेशआंध्र प्रदेशच्या आजी-माजी आमदारांची माओवाद्यांकडून हत्या

आंध्र प्रदेशच्या आजी-माजी आमदारांची माओवाद्यांकडून हत्या

Subscribe

आंद्र प्रदेशच्या दोन आजी-माजी आमदारांची नक्षलवाद्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना विशाखापट्टनम येथे घडली आहे. दोघेही एकत्र प्रवास करत असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे.

विशाखापट्टणम येथील अरुकू आमदार किडी सर्वेश्वर राव आणि माजी अराकू आमदार सिव्हरी सोमा यांची डमब्रगुडा मंडळातील नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची ताजी घटना समोर येत आहे. दोघेही एकत्र प्रवास करत असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे आंध्र प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्य माहितीनुसार, अराकू घाटीमध्ये दोघांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. रिपोर्टनुसार राव यांच्या खासगी सचिवाचाही मृत्यू झाल्याचे समजते. हल्ल्यानंतर तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

ही घटना विशाखापट्टणमच्या तटीय शहरापासून सुमारे १२५ किमी दूर थुंत्गुंगी गावाजवळ घडली. अराकूमध्ये कार्यक्रमात असताना माओवाद्यांनी राव आणि माजी आमदार सिव्हरी यांच्यावर हल्ला केला.ही घटना विशाखापट्टणमच्या तटीय शहरापासून सुमारे १२५ किमी दूर थुंत्गुंगी गावाजवळ घडली. अराकूमध्ये कार्यक्रमात असताना माओवाद्यांनी राव आणि माजी आमदार सिव्हरी यांच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

नक्षलवाद्यांनी पॉईंट शून्य श्रेणीपासून आमदारांना लक्ष्य केले. या हल्ल्यात मोठ्या संख्येने माओवाद्यांनी सहभाग घेतला होता, असे आयएएनएसच्या अहवालात म्हटले आहे. २०१४ च्या निवडणुकीत व्हायएसआर काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर, टीडीपीच्या सोमाला पराभूत करून राव अनुसूचित जनजातीसाठी राखीव असलेल्या अराकु मतदारसंघातून निवडून आले होते. नंतर राव यांनी व्हायएसआर काँग्रेसमधून टीडीपीमध्ये पक्षांतर केले होते. तर चंद्रबाबू नायडू यांच्या मंत्रीमंडळात त्यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्यासंबंधी अधिक तपास सुरू आहे.राव आणि सोमा यांना यापूर्वी नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -