घरमुंबईBMC : निवडणूक आयोगाची सूचना अन् मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची खांदेपालट!

BMC : निवडणूक आयोगाची सूचना अन् मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची खांदेपालट!

Subscribe

सह आयुक्त रमेश पवार (सुधार) हे 1 एप्रिल 2024 रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वीच त्यांच्याकडील (सुधार) खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारी वर्गात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखीन कोणत्या अधिकाऱ्यांचे खाते बदल अथवा बदली होणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य शासनाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीपूर्वीच आवश्यक अधिकाऱ्यांच्या बदल्या, खाते बदल आदी घडामोडी करून घेण्याबाबत सूचना नुकत्याच दिल्या होत्या. त्यानुसार, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने सह आयुक्त रमेश पवार (सुधार) यांच्याकडील खाते काढून घेत ते उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडील (विशेष) हे खाते काढून ते सह आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (BMC Notice of the Election Commission and Mumbai Municipal Corporation officers shrug)

सह आयुक्त रमेश पवार (सुधार) हे 1 एप्रिल 2024 रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वीच त्यांच्याकडील (सुधार) खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारी वर्गात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखीन कोणत्या अधिकाऱ्यांचे खाते बदल अथवा बदली होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Crime News: माता न तू वैरणी! शौचालयात अर्भक टाकून माता फरार; उल्हासनगरातील घटना

कोणाला कुठे टाकले, पाठवले जाईल, याबाबत अधिकारी वर्गात कुजबूज सुरू झाल्याचे पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. सह आयुक्त रमेश पवार (सुधार) हे राज्यात महविकास आघाडीचे सरकार असताना आणि मुख्मंत्रीपदावर उद्धव ठाकरे हे असताना त्यांना विशेष बाब म्हणून पालिका आयुक्त कार्यालयातून थेट नाशिक महापालिका आयुक्त पदावर पाठविण्यात आले होते. मात्र राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर रमेश पवार यांना पुन्हा मुंबई महापालिकेत माघारी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांना सह आयुक्त रमेश पवार (सुधार) या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : Loksabha Election : मोदींच्या दौऱ्यात महायुतीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ!

उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे (विशेष) काही दिवसांपूर्वीच उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. असे असताना पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने 12 जानेवारी रोजी सह आयुक्त रमेश पवार (सुधार) यांच्याकडील खाते काढून घेत ते उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडील (विशेष) हे खाते काढून ते सह आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने तसे परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र, उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडील ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हे खाते त्यांच्याकडे तसेच ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -