घरदेश-विदेशनिवडणूक निकालाच्या दिवशीच काँग्रेसची बैठक

निवडणूक निकालाच्या दिवशीच काँग्रेसची बैठक

Subscribe

पवारांसह समविचारी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रण

येत्या २३ मेला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याच दिवशी काँग्रेसने एनडीएत सहभागी नसलेल्या विविध राज्यातील स्थानिक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक नवी दिल्लीला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांसह अनेक पक्षाच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखली आहे. त्यानुसार, भाजप आणि एनडीएला बहुमत मिळाले नाहीतर सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली करायचा, असे काँग्रेसने ठरवल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यासाठी समविचार विविध राज्यातील स्थानिक पक्षांचा आधार घेतला जाणार आहे. त्यांना एकत्र आणण्याच्यादृष्टीने सोनिया गांधी यांनी धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, जनता दल, सेक्युलर पक्षाचे देवेगौडा, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, आंध प्रदेशचे मुख्यमंत्री चंंद्रशेखर राव आदी नेत्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या चार वरिष्ठ नेत्यांची एक टीम बनवण्यात आली आहे. ही टीम सर्व प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून त्यांचे मुद्दे जाणून घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या टीममध्ये अहमद पटेल, पी. चिदम्बरम, गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. हे नेते समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलणी करून आघाडीसाठी प्रयत्न करणार आहेत.

भाजपला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणार नाही, असा काँग्रेसला ठाम विश्वास आहे. त्यातच भाजप आणि मोदीविरोध या एकाच मुद्यावर समविचारी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येऊ शकतील, अशी काँग्रेसची धारणा आहे. त्यामुळे स्वत: सोनिया गांधी या पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन करत आहेत. सत्ता स्थापनेची कुठलीही संधी काँग्रेसला गमवायची नाहीए. यामुळे काँग्रेसने इतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांना गळ घालण्याची तयारी सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -